Indian Army Viral Video : ना कशाची तक्रार! ना तमा.. कोरडी चपाती असूनही हसत-खेळत जेवतायत भारतमातेचे जवान; नक्की पाहा व्हिडिओ

Indian Army Video : देशाच्या सुरक्षेसाठी भारतमातेचे जवान हे सीमेवर 24 तास हे तैनात असतात. बर्फाळ डोंगरांवर त्यांना कितीतरी आव्हानांना तोंड द्यावं लागतं असत. मात्र, डोळ्याची पापणीही लवू न देता ते देशाची रक्षा करत राहत असतात.

देशाच्या जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही जवान दुपारचं जेवण करताना आहेत. त्यांच्याकडे असणारी चपाती एवढी कोरडी झाली आहे, की ती तोडण्यासाठी त्यांना हे भरपूर प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र, कोणतीही तक्रार न करता ते अगदी हसत-खेळत जेवण करताना पहायला मिळत आहेत.

Bank Account New Rules : 1 जानेवारीपासून बँक खात्यात फक्त एवढेच पैसे ठेवता येणार; RBI ने मिनिमम बँक बॅलन्सचे नवीन नियम पहा..!

आरव्हीसीजे मीडिया या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये १ जवान मजेत म्हणत आहे, की ही चपाती तोडण्यासाठी करवत मिळेल का ? त्यावर दुसरा जवान उत्तर देतो, की ‘आज बाकी दिवसांच्या तुलनेत मऊ चपाती बनवलेले आहे.’ यावर सगळे हसू लागतात, आणि हे आपलं जेवण सुरू ठेवतात.

एकीकडे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तक्रार करणारे आपण सगळे, आणि तिकडे सीमेवर प्रतिकूल परिस्थितीमध्येही हसत-खेळत जेवण करणारे जवान असा फरक स्पष्ट दाखवणारा हा व्हिडिओ नेटिझन्सना भरपूर पसंत पडत असल्याचे पहायला मिळत आहे. ‘भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम’, ‘यावर विश्वास बसत नाही’, पण ‘हे आपले खरे हीरो आहेत.’ अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडिओला मिळत आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360