किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे? फायदे काय आहेत? | किसान क्रेडिट कार्ड योजना | Kisan Credit Card Online Apply 2023

आज आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? ते कसा मिळवायचे, किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र यादी, किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे, किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे, किसान क्रेडिट कार्ड अर्ज, किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली, या विषय सविस्तर माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा. 2018 – 19 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सरकारने पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही या योजनांचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आला आहे.

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे काय आहेत? | Kisan Credit Card Benefits in Marathi

किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे? फायदे काय आहेत? | किसान क्रेडिट कार्ड योजना | Kisan Credit Card Online Apply  2023

किसान क्रेडिट कार्ड वर बँक शेतकऱ्यांना फक्त 4% टक्के दराने कर्ज उपलब्ध करून  देत असते.
शेतकऱ्यांनी पहिल्या कर्जाची परतफेड ही कालावधीत वेळेवर केली. तर त्याला 2% सवलत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल
.

किसान क्रेडिट कार्ड साठी कोणतेही शेतकरी, तसेच अल्पभूधारक शेतकरी, देखील अर्ज करू शकतात. यामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन असणारे किंवा इतरांची जमीन भाडेतत्त्वावर वापरणाऱ्या किंवा अल्पभूधारक सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता येतो. यासोबतच 2018 – 19 मध्ये संकल्प अधिवेशना दरम्यान सरकारने पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही या योजनांचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आला आहे.

देशातील आजही सर्वाधिक लोकसंख्या ही आजही कृषीवर अवलंबून आहे. तसेच देशाच्या जीडीपी मध्ये शेतीचा 18 ते 20 टक्क्यांपर्यंत वाटा आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. त्यापैकीच एक म्हणजे “किसान क्रेडिट कार्ड” आहे. शेतीतील उत्पादन हे अनेक गोष्टीवर अवलंबून असते. ज्यामध्ये हवामान हा महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेक वेळा अतिवृष्टी होऊन वादळ महापूर या गोष्टींमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो. अशोक परिस्थितीत खाजगी संस्थांकडून उच्च व्याजदर आणि कर्ज घेऊन त्याची परतफेड करणे हे शेतकऱ्यांना अवघड जाते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड काढले आहे याद्वारे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने ( वित्तपुरवठा ) कर्जपुरवठा केला जातो. किसान क्रेडिट कार्ड ही योजना मुळात 1998 मध्ये सुरू करण्यात आलेली होती या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त दराने कर्ज पुरवठा मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

किसान क्रेडिट कार्ड पात्रता निकष | Kisan Credit Card Eligibility Criteria


सरकार किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देत असते. हे कर्ज केवळ चार टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वय कमाल मर्यादा 75 वर्ष आहे. अशी शेतकरी किसान क्रेडिट कार्ड साठी पात्र ठरतील.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे? | Required Documents for Kisan Credit Card in Marathi

  • ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • स्पोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड
  • सातबारा उतारा
  • ड्रायव्हिंग लायसन्स

Kisan Credit Card Online Apply करण्यासाठी येथे क्लिक करा

किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे? फायदे काय आहेत? | किसान क्रेडिट कार्ड योजना | Kisan Credit Card Online Apply  2023

किसान क्रेडिट कार्ड अर्ज? Credit card apply Marathi किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे? किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे?


STEP 1 : गुगल वर जाऊन   pm किसान असे search करा आणि या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करून घ्यावा.


STEP 2 :- पी एम किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांनी तो कृषी सहाय्यक तसेच कृषी अधिकारी यांच्या मदतीने भरून आपले पीएम किसान खाते असलेल्या जवळच्या बँकेत जमा करावा. यासोबत वरील सांगितलेली आवश्यक कागदपत्रे जोडावी त्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी केली जाते.


सरकारने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार सांगितले आहे. की देशामध्ये नऊ ते दहा कोटी शेतकरी किसान क्रेडिट कार्ड वापरत असतील असं सांगण्यात आलं आहे. पी एम किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा भाग म्हणून सरकारने वेबसाईटवर अधिकृत अर्ज प्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे.

किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा?
Kisan credit card online apply in Marathi


तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही सरकारी बँकेमध्ये जाऊन करू शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज भरण्याची विनंती करा. त्यानंतर वरील नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स जमा करावी लागेल. याशिवाय तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाईट द्वारे किसान क्रेडिट कार्ड केसीसी Kisan Credit Card ( KCC ) अर्ज करू शकता मात्र काही गोष्टी लक्षात ठेवा. की काल मिळवण्यासाठी तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे बंधनकारक करण्यात आलेला आहे.

पी एम किसन क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम गुगल ओपन करून पीएम किसान असं टाईप करायचं आहे आणि तुमच्यासमोर पंतप्रधान किसान सन्मान निधीची वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यात डाऊनलोड केसीसी फॉर्म हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून किसान क्रेडिट कार्ड चा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल तो डाउनलोड करून घ्यायचा आहे.  नंतर हा अर्ज भरायचा. आणि तुमची पी एम किसान खाते असलेल्या बँकेमध्ये जमा करायचा.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र यादी?


✅ किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र यादी बँक द्वारे आपल्या वेबसाईटवर जाहीर केली जाते.


किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली?


✅ किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात ऑगस्ट 1998 मध्ये झाली त्यावेळेस वित्तमंत्री यशवंत सिन्हा होते.

किसान क्रेडिट कार्ड कोणत्या बँका देतात?


✅महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक ग्रामीण बँक, तसेच सार्वजनिक बँका, किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देतात.


किसान क्रेडिट कार्ड वर व्याजदर किती आहे?


✅किसान क्रेडिट कार्ड व्याजदर 4% आहे. कर्जाचा परतवा केल्यास प्रति वर्ष 2 टक्के अधिक सूट दिली जाते.


KCC कार्ड फक्त शेतकऱ्यांसाठी आहे का?


✅ होय.  फक्त शेतकऱ्यांसाठी आहे

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360