Ladki Bahin 1st Installment: लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता दि. 17 ऑगस्ट रोजी पात्र महिलांना दिला जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाने 17 ऑगस्ट रोजी कोणत्या महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळुन 3000 रूपये जमा केले जाणार आहेत. पण यासाठी २ अटी आहेत. याबाबत माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर
लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळुन 3000 रूपये 17 ऑगस्ट 2024 रोजी फक्त 14 ऑगस्ट पुर्वी अर्ज अप्रोवल (Approval) झालेल्या महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे मिळून 4500 रुपये एकदाच जमा केले जाणार आहेत. Ladki Bahin 1st Installment
तसेच लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे टाकले जाणार असून DBT द्वारे पैसे येण्यासाठी तुमच्या बॅंकेला आधार सिडींग ॲक्टिव असने आवश्यक आहेत. जर तुमचे बॅंक सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर तुमचा अर्ज अप्रोवल (Approved) असुन सुद्धा तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने आवश्यक आहेत.
Bank Account Aadhaar Link: लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँकेत येणार पहा!
जर तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर तुमच्या बॅंकेत जाऊन आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव करण्यासाठी अर्ज करावा. किंवा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडल्यानंतर दोन तीन दिवसात तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव होते.व पोस्ट पेमेंट बँकेत तुमचे लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार आहे.
तसेच तुम्ही अर्ज करताना कोणत्याही बॅंकेचे खाते क्रमांक दिला असला तरी ज्या बॅंकेत तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव आहेत. त्याच बॅंक खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसेल, तर तुम्ही बॅंकेत जाऊन अर्ज करा किंवा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडायचे आहे. आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार आहे.
ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्ट नंतर अप्रोवल (Approved) होणार आहे. त्या महिलांना सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचे मिळून 4500 रूपये एकदाच जमा केले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल आलेले आहे. त्या पोर्टलवर अर्ज करावेत तसेच अर्ज करताना अगदी काळजीपूर्वक आणि स्पष्ट कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.