Ladki Bahin Yojana 3rd Installment Date: लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा मिळणार? या संदर्भात एक अपडेट आलेली आहे, त्यानुसार तारीख सुध्दा जाहीर करण्यात आली आहेत.
लवकरच लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे.
किती तारखेला पैसे बँक खात्यावर जमा होणार? वेळ काय असणार? याची सविस्तर माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि हि पोस्ट इतर महिलांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण Ladki Bahin Yojana 3rd Installment Date जाणून घेता येईन.
लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर ला जमा केला जाणार आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिलांना मिळत आहे. माझी लाडकी बहिण योजना 2024 साठी सरकारने ज्याप्रकारे GR मध्ये सांगितले होते, त्यानुसार पहिले दोन हप्ते पात्र महिलांना मिळाले आहे.
जुलै महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचे अर्ज Approved झाले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 1500 प्रमाणे 3000 रुपये दिले गेले आहे.
पण ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ज्यांनी अर्ज केले आहे. त्यांना मात्र अजून पण लाडकी बहिण योजनेचे पैसे भेटले नाही. यामध्ये काही अपवाद अशा महिला जुलै महिन्यातील सुद्धा राहिल्या आहे.
ज्यांना अजून पण एकही हप्ता भेटला नाहीत. त्यांना आता या वेळी यंदाच्या हप्त्यामध्ये मागील सर्व हप्त्याचे पैसे भेटणार आहे. मिळणारी रक्कम हि 4500 रुपये असणार आहेत.
या तारखेला लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना 4500 रुपये मिळणार पात्रता यादी जाहीर
सोबत ज्यांना मागील दोन हप्ते भेटले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये भेटणार आहे.
लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार?
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर 2024 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यावर हा जमा होणार आहे. या संदर्भात अधिकृत अपडेट आली आहे, रायगड जिल्ह्यात एक कार्यक्रम होणार आहेत तेव्हा सरकार मार्फत लाडकी बहिण योजनेचा तिसरा टप्पा (हप्ता) सर्व महिलांना दिला जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
या संबंधी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या बद्दल माहिती आहे, आता फिक्स तारीख सांगण्यात आलेली आहे. Ladki Bahin Yojana 3 ra tappa हा 29 सप्टेंबर रोजी जमा केला जाणार आहे.
राज्यातील जेवढ्या काही पात्र महिला आहेत त्यांना Ladki Bahin Yojana 3rd Hafta हा येणाऱ्या 29 तारखेला मिळणार आहेत, काही दिवस राहिले आहे, त्यामुळे आता एक प्रकारे सर्व महिलांना अखेर दिलासा मिळालेला आहे.
सूचना: 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांचे अर्ज Approved झाले आहे, केवळ त्याच महिलांना मागील सर्व महिन्यांचे हप्ते (4500 रुपये) मिळणार आहेत. सप्टेंबर मध्ये जर अर्ज केला असेन, किंवा ऑगस्ट मधील अर्ज सप्टेंबर मध्ये Approved झाला असेल तर मात्र तुम्हाला मागील हप्ते मिळणार नाही.