Ladki Bahin Yojana | महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलेली होती.(Ladki Bahin Yojana)
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. तर महाविकास आघाडीकडूनही महालक्ष्मी योजनेबाबत आश्वासन देण्यात आलेलं होतं. मविआ सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देणार अशी घोषणा महाविकास आघाडीने देखील केली होती. मात्र, निवडणुकीत महायुतीने बाजी मारलेली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी देण्यात आलेली आश्वासने सरकार पूर्ण करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.
लवकरच मंत्रीमंडळ विस्तार देखील होईल. यानंतर कॅबिनेट बैठकीत या योजनेबाबत निर्णय होणार आहे. अशात सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Loan
“…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”
महिलांना डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहेत. राज्यात 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतलेला आहे. मात्र आता सरकार फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळवावा, यावर भर देणार आहेत. योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाहीत हे तपासले जाणार आहेत. यामुळे आर्थिक सहाय्य करताना पारदर्शकता येईल, असं सांगितलं जातं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास सर्व 2 कोटी अर्जदार महिलांना या तपासणीत समाविष्ट केले जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे, खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी केली जाईल. (Ladki Bahin Yojana)
‘या’ कागदपत्रांची तपासणी होणार आहे
उत्पन्नाचा पुरावा सादर : अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहेत, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहेत
आयकर प्रमाणपत्र : लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाणार आहे.(Ladki Bahin Yojana)
सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी : निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची तपासणी केली जाणार आहे. यात त्रुटी आढळल्यास अर्ज बाद केले जातीन.
त्याचबरोबर पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत.
तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच हा लाभ दिला जाणार आहेत. (Ladki Bahin Yojana)
हमीपत्र : या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरतानाच एक हमीपत्र लिहून दिलेले होते. आता त्याच हमीपत्रांची देखील पडताळणी सुरू झालेली आहे.