लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत काय करावे? मंत्री आदिती तटकरे Ladki Bahin Yojana Beneficiary Status

Ladki Bahin Yojana Beneficiary Status: जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून 3,000 रूपये आता पर्यंत पात्र महिलांच्या (80 लाख) खात्यात जमा झालेले असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहेत. या योजनेसाठी केलेल्या अर्जापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद झालेले आहे तसेच उशिरा अर्ज केलेल्या महिलांना सुद्धा अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाहीत.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर 2024 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा होतील जर 17 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर असून सुद्धा पैसे मिळाले नाहीत. तर तुम्हाला तुमच्या बॅंकेशी आधार सिडींग स्टेट्स चेक करुन ॲक्टिव नसेन तर ॲक्टिव करावे लागणार आहेत. लाडकी बहिण योजनेचे पैसे थेट DBT द्वारे आधार लिंक बॅंकेत जमा होत असल्याने तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असणे आवश्यक आहेत.

लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात! तुम्हाला आले का?

तुम्ही बॅंकेशी आधार लिंक केल्यानंतर तुमचे पैसे जमा होतील तरी महिलांनी निश्चित रहावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सांगितलेले आहे.

ज्या महिलांचे अर्ज 01 ऑगस्ट नंतर केले आहेत. त्या महिलांचे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू केलेली असून लवकर हे अर्ज मंजूर होतीन. व उशिरा अर्ज केलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर चे मिळुन 3 हप्ते (4500) एकदाच जमा होतील असे ही शासनाने सांगितले आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महिलांना महत्त्वाची माहिती दिलेली असून अर्ज करण्याची तारीख हि 31 ऑगस्ट नसुन कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तरी ज्या महिलांनी अटी आणि शर्ती च्या बंधनांमुळे अर्ज केले नाहीत. त्या महिलांना ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज करता येणार आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360