Ladki Bahin Yojana Changes: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा नव्याने काही बदल करण्यात आलेले होते. या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळावा असा सरकारचा प्रयत्न आसून योजना घोषीत झाल्यापासून आता पर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहेत. जेणे करून महिलांसाठी अर्ज करणे सुलभ होणार आहेत.
या योजनेत कागदपत्रांबाबत अजूनही काही अडचणी येत होत्या मात्र याबाबत सरकारने दखल घेतलेली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार लाडकी बहिण योजनेत आता 6 नवे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पात्र महिलांना अर्ज करणे अधिक सुलभ होणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. आता फक्त ही ३ कागदपत्रे लागणार! Mukhymantri Ladki Bahin Yojana Document
लाडकी बहिण योजनेतील 6 नवे बदल खालीलप्रमाणे आहेत
1) पोस्ट बँक खाते असल्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरणार आहे
2) दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातल्या पुरूषा बरोबर लग्न केल्यास पतीच्या कागदपत्रावर तिला लाभ मिळणार आहेत
3) गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत, त्यात बदलही केले जाणार आहे
4) केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही यापुढे लाभ मिळणार आहे
5) नवविवाहीत महिलेची नोंदणी शक्य नसल्यास, तर पतीचे रेशन कार्ड ग्राह्य धरले जानार आहेत.
6) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार आहे
लाडकी बहिण योजनेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे, आणि या नव्या बदलामुळे अर्ज करण्यात आणखी सुलभता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. Ladki Bahin Yojana Changes