Ladki Bahin Yojana Last Date: लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आली! अर्जाची तारीख वाढली

लाडकी बहिन योजना : महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेस अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदत वाढविण्यात आलेली आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहेत.

महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत देण्यात आलेली आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता तुम्ही 15 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र हा अर्ज अंगणवाडी सेविकेमार्फतच भरावा लागणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीन योजनेला ग्रामीण ते शहरी भागातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे सरकारने ॲप आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केलेली होती. मात्र आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु ऑनलाइन किंवा ॲपद्वारे अर्ज करणे शक्य नाही. आता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज करावा लागणार आहेत.

लडकी बहीण योजना; या महिलांना मिळाले 7,500 रुपये ; यादी जाहीर

लाडकी बहिण योजनेची मुदत तिसऱ्यांदा वाढवलेली आहेत.

लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 करण्यात आली होती. मात्र नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली. आता तिसऱ्यांदा 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहेत.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

1) आधार कार्ड
2) नागरिकत्व/जन्म प्रमाणपत्र
3) उत्पन्न प्रमाणपत्र
4) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
5) बँक पासबुक
6) अर्जदाराचा फोटो

महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहेत. राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला अर्ज करू शकता. यापूर्वी महिला लाभार्थ्यांचा वयोगट 21 ते 60 वर्षे होता. नवीन बदलानुसार ते 21 वरून 65 वर्षे करण्यात आले आहेत. लाडकी बहिन योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहेत. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360