मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त अर्ज पात्र ठरलेले आहेत. 19 ऑगस्ट 2024 रोजी पात्र ठरलेल्या महिलांना 3 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभ मिळणार आहे. आतापर्यंत एकूण दोन कोटी पेक्षा अधिक अर्ज पात्र असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. आणि अजून देखील काही अर्ज पात्र ठरण्यासाठी यादी ची प्रतीक्षा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून दररोज लाखो अर्ज दाखल होत आहेत. दररोज खूप मोठ्या प्रमाणावर अर्जांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि यामुळे सरकारच्या तिजोरीवरती देखील खूप मोठ्या प्रमाणावर ताण पडणार असल्याचे सांगितले जाते आहे.
लाडकी बहीण योजना यादी कुठे पहायची?
लाडकी बहीण योजनेची यादी अर्ज करणाऱ्या महिलांना आपल्या गावामध्ये पाहता येणार आहे. तसेच प्रत्येक गावामध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांची यादी देखील वाचली जात आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या गावामध्ये शनिवारी तसेच तुम्ही इतर दिवशी देखील हजर राहून तुम्ही पात्र झाला आहात. किंवा नाही हे सहजरीत्या तपासू शकतात. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही. पात्र ठरलात किंवा नाही तुमचा अर्जाची सर्व स्थिती तुम्हाला गावामध्ये सांगितले जाते ते तुम्ही तपासू शकता किंवा मोबाईलवर देखील पाहू शकता.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार?
लडकी बहीण योजने चे पैसे 19 ऑगस्ट 2024 रोजी 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्यक्ष हस्तांतरित करण्यात येणार आहेत. सध्या अर्ज मंजूर करण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू असून शासनाकडून देखील यासाठी गती देण्यात आलेली आहे.