Ladki Bahin Yojana Mobile Online Apply: या लडकी बहिणींना सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज!

Ladki Bahin Yojana Mobile Online Apply: लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारकडून राबवले जाणारे एक महत्त्वपूर्ण योजना असून सध्या राज्यघरातील खूप मोठ्या प्रमाणावर महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर याच्या उलट काही महिलांना या योजनेचा अद्याप एक रुपया देखील जमा झालेला नसतानाच सरकारकडून महिलांना मोफत मोबाईल मिळणार या चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या महिलांना तीन हजार रुपये बँक खात्यावरील जमा करणे सुरू आहे. तसेच 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे एकत्रित रित्या तीन हजार अधिक 2500 दिवाळी बोनस अशाप्रकारे एकूण 5500 रुपये जमा करण्यात येत आहेत.

लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल मिळणार का?

मित्रांनो सध्या लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल मिळणार अशा प्रकारची चर्चा सगळीकडे होऊ लागलेली आणि तुम्ही सुद्धा युट्युब ला पाहिलेच असेल युट्युब ला महिलांना मोफत मोबाईल मिळणार अशा व्हिडिओला प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात घेऊन येत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे सोशल मीडियावर देखील महिलांना मोफत मोबाईल मिळणार अशा प्रकारची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

नुकतेच उदय सामंत यांनी एका कार्यक्रमांमध्ये महिलांना मोफत मोबाईल देणार असल्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे या चर्चांना उधाण आल्याचे पहायला मिळते आहे. अशाप्रकारे उद्या सामंत यांनी लाडके बहिणींना मोबाईल गिफ्ट करण्याची घोषणा केलेली आहे परंतु यासाठी कोणतीही अंमलबजावणी होणार का नाही याबद्दल कोणतीही माहिती अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

लाडकी बहिण योजनेचे 3,000 हजार झाले जमा, मिळाले नसल्यास तात्काळ हे काम करा

त्यामुळे महिलांना मोफत मोबाईल साठी राज्य सरकारकडून कोणताही शासन निर्णय किंवा लिंक जाली करण्यात आलेली नाही. केवळ निवडणुकांपूर्वी अशा प्रकारचे मोबाईल वाटपाचे आश्वासन देऊ शकतात. परंतु मोबाईल वाटप करण्यात येतील अशा प्रकारची कोणतीही माहिती सरकारकडून घेण्यात आलेली नाही. मात्र महिलांना सध्या ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रितरीत्या तीन हजार रुपये तसेच दिवाळी बोनस 2500 रुपये एकत्रित रित्या जमा करण्यात येत आहेत.

महिलांना मोफत मोबाईल मिळणार कितपत खरे?

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल मिळणार आहे अशा प्रकारची बातमी सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच देखील मोफत मोबाईल मिळणार या व्हिडिओला खूपच मोठ्या प्रमाणात व्ह्यू येत असल्याचे देखील युट्युब ला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्ज भरताना वेबसाईट सरकारीच आहे का याची खात्री करणे देखील खूप महत्त्वाची आहे. तसेच कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईट आणि एप्लीकेशन च्या माध्यमातून अर्ज करू नयेत अशा प्रकारचे आव्हान देखील सध्या करण्यात येत आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360