Ladki Bahin Yojana Money Deposit Bank Account: लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठी खुशखबरः आलेली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत महिलांच्या खात्यावर 1500 रूपये याप्रमाणे पाच हप्ते जमा केलेले आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याने काही महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता मिळालेला नव्हता.
आता विधानसभा निवडणुका पुर्ण झाल्या असून आता या योजनेचे थकित असलेले हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत. ज्या महिलांना आतापर्यंत 4,500 हजार मिळाले आहे. अशा महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रूपये जमा होणे सुरू झालेले आहे.
लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती! महिलांनो, योजनेत तुमचं नाव आहे का? येथे चेक करा – इथे तुमच्या मोबाईलवरून 5 मिनिटांत चेक करा..
राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर चा हप्ता तात्काळ जमा करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. लवकरच लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. सध्या आतापर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे मिळाले नाही अशा महिलांना थकित हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत.
आदिती तटकरे यांनी सांगितले की लाभार्थीबाबत तक्रार आली तर त्या आधारे छाननी केली जाणार आहे. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत अशा प्रकारची कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला माहिती नाहीये. परंतु तक्रारी असतील तरच त्या संदर्भातील छाननी होईल असे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे.