सध्या राज्यभरात वेड लावणारी योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना आणि गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार या योजनेमध्ये झालेले बदल यामुळे ही योजना खूप चर्चेस आलेली आहे. आणि यामुळे राज्यभरातील महिलांच्या मनामध्ये योजनेच्या विषयी खूप मोठे संभ्रम देखील निर्माण झालेले आहेत.
लडकी बहीण योजना चे पैसे जमा होण्यास सुरुवात
महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेची सुरुवात झालेली असून अजून या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठरविण्यात आलेली होती. पण त्यापुढे देखील कायमस्वरूपी अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच आदिती तटकरे यांनी जाहीर केलेली आहे. यामुळे महिलांना अजून एक दिलासा मिळालेला आहे. आतापर्यंत या योजनेसाठी १ कोटी ४५ लाख महिला या योजनेसाठी पात्र झालेल्या असून त्यांच्या खात्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण ३ हजार रुपये जमा केले जात आहेत
लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात Ladki Bahin Yojana Payment Status
Ladki Bahin Yojana Money Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठरवण्यात आलेली होती. पैसे मिळण्यास सुरुवात होण्याच्या अगोदर ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झालेल्या आहेत त्या महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होणार आहेत.
तुमच्या अर्जामध्ये कोणते अडथळे आलेले असतील किंवा तुमचा अप्रूवल झालेला नसेल किंवा तुमचे कागदपत्र अपलोड करताना काही अडचण येत असतील आणि जर तुम्ही अजूनही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला एकत्रितपणे सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिलेले आहेत.