ladki Bahin Yojana next Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे ७,५०० रुपये बँक खात्यावर जमा झालेले आहे. निवडणुका असल्यामुळे सरकारने एका महिन्याचे पैसे ही महिलांना आधीच दिले आहे.
त्यामुळे आता महिलांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा ही लागलेली आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुका आहे, त्यामुळे या गोंधळात महिलांना पुढील हप्ता नेमका कधी मिळणार! याची उत्सुकता देखील आहे.
‘या’ महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले
जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, त्यानंतर महिलांनी अर्ज करायला सुरुवात केलेली होती. ज्या महिलांनी 31 जुलैपूर्वी अर्ज केले होते, त्यांच्या खात्यात रक्षाबंधनाआधी 3,000 रुपये जमा झालेले. नंतर सरकारने अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली होती, आणि या महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झाले.
त्यानंतर सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ दिली गेलेली. पुढे 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती, आणि या वेळेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 300 रुपये जमा झाले.
: लाडक्या बहिणींना आता मिळणार 11000 रुपये महिना नोकरी; सरकारची मोठी घोषणा.!
सरकारने नोव्हेंबरचा हप्ता एक महिन्याआधीच जमा केलेला, त्यामुळे आतापर्यंत एकूण 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
पुढचा हप्ता कधी मिळणार आहेत?
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईन, असा विरोधकांचा दावा वारंवार करण्यात आलेला जात आहे. या दाव्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट देखील केलेले आहे.
त्यांनी सांगितलेले आहे की, महिलांच्या खात्यात आतापर्यंत पाच महिन्यांचे म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत ७,५०० रुपये जमा झालेले आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरमध्ये येणाऱ्या १,५०० रुपयांची उत्सुकता लागली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्याचा लाभ सर्व पात्र महिलांना डिसेंबर च्या सुरुवातीला लिभ दिला जाईल.
तसेच या योजनेबद्दल कुठल्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील महिलांनी बळी पडू नयेत, असेही आवाहन त्यांनी केलेले आहे.
योजनेच्या निधीला ब्रेक मिळणार आहे काय?
लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अडथळा येणार असल्याच्या बातमीनंतर, इंडिया टुडेने महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलेला होता.
त्यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, परंतु मॉडेल कोड ऑफ कंडक्टनुसार (MCC) कोणत्याही नवीन लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करता येणार नाहीत.
तसेच, महिला आणि बालविकास विभागाने महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करायचे असल्यास, त्यांना निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी देखील घ्यावी लागेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले होते.