Ladki Bahin Yojana Status लाडकी बहिण योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला 31ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरले जात आहे.
जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेतील अटी व शर्ती काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 2.50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या तसेच 21 ते 65 या वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Ladki Bahin Yojana Status 2024)
जगातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार; पहा कोणत्या जिल्ह्यात जास्त परिणाम होणार IMD Mansoon Alert 2024
लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार याची माहिती नुकतीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. रक्षाबंधन म्हणजे 19 ऑगस्ट रोजी लाडकी बहिन योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाईल. ज्या महिलांचे अर्ज लवकर भरलेले त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहे. म्हणजेच 15 ऑगस्ट पूर्वी अर्ज केलेल्या महिलांना दोन्ही हप्ते मिळतील अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे. (Ladki Bahin Yojana Status)
ज्या महिलांचे अर्ज उशिरा म्हणजे 15 ऑगस्ट नंतर सबमिट केले गेलेले आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये तीन हप्त्यांमध्ये एकत्रितपणे जमा केले जाणार आहे. ज्या महिलांना 19 ऑगस्ट रोजी हप्ते मिळत नाही, त्यांच्यासाठी पुढील महिन्यात सर्व हप्ते एकत्र जमा केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा. (Ladki Bahin Yojana Status)