Ladki Bahin Yojna New changes: लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून लाभार्थ्यांच्या निकषात बदल करण्याची बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु माजी महिला व बाल विकास मंत्री आदीती तटकरे यांनी महिलांनासाठी दिलासा देत महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
लाडकी बहिण योजनेत निकष वाढवून योजनेतून मोठ्या संख्यने महिलांना बाहेर केले जाणार असल्याचे वृत्त येत असल्याने महिलांना चिंता होती. परंतु आता आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या योजनेत सरसकट छाननी करण्याचा कोणताही शासन निर्णय झालेला नाहीत. असे अदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच लाडकी बहिण योजनेची छाननी हे केली जाईल, परंतु ती छाननी तक्रारींच्या आधारे केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत योजना सुरूच राहणार आहे आणि या योजनेची रक्कम आगामी बजेटमध्ये 2,100 रुपये करण्यात येईल असे देखील सांगितलेले होते. त्यासाठी लागणारी तरतुद देखील करण्याची तयारी आम्ही करत आहोत. त्यामुळे योग्य पद्धतीने निर्णय केले जाणार आहे. 2100 रुपये देण्याची घोषणा करू. तसेच जी आश्वासने आम्ही दिली आहे. ती नक्कीच पूर्ण करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे.
लाडकी बहिण योजनेत सरसटक अर्जाची छाननी होणार नाहीत – अदिती तटकरे
मागील दोन दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी होणार असून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जाणार आहे अशा बातम्या येत आहेत. यावर माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहेत. आदिती तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळलेल्या आहेत. तसेच अशा प्रकारे सरसटक छाननी करण्याचा सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाहीत, तक्रारी आल्या तर त्याच्या आधारे छाननी केली जाईल असे त्यांनी सांगितलेले.
लाभार्थ्याची तक्रार आली तरच छाननी होणार – आदिती तटकरे
आदिती तटकरे यांनी सांगितले की लाभार्थीबाबत तक्रार आलीत तर त्या आधारे छाननी केली जाणार आहे. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नाहीत. तक्रारी असतील तरच त्यासंदर्भातील छाननी होणार आहे.