शेत जमीन नावावर करा फक्त १०० रुपयांत ( Land Record News )

Land Record News : नमस्कार मित्रांनो, आता वडिलोपार्जित जमीन अथवा संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा हा खर्च करावा लागणार नाही, असा शासनाचा नवीन शासन निर्णय GR आलेला आहे. जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र Land Record आता अवघ्या फक्त शंभर रुपयांत करता येणार आहे. यासंबंधीची सर्व माहिती आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहूया.

वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलींकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत, असल्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता. परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे एक आदेश जारी करण्यात आलेला आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की, हिंदू कुटुंब पद्धतीने नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल कलम अधिनियम ८५ यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि हे शंभर ₹ रुपयांमध्ये करता येणार आहे.

हे वाचा Land record : बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांवर आता सॅटेलाइट ठेवणार लक्ष..! बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांची खैर नाही

आता वडिलोपार्जित जमीन फक्त शंभर रुपयात नावावर

शासनाच्या या नवीन निर्णयामुळं अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे .त्यासोबतच पहिल्या शासन निर्णयानुसार जास्त मुद्रांक शुल्क लागत असल्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत चालली होती. यामुळे या नवीन शासन निर्णयामुळे शेतकरी बांधवांचा फायदा होणार आहे.


शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की, वडिलोपार्जित जमिनीला नाव देताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा खूप पैसा देखील वाया जातो. त्याचबरोबर त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाया जात असतो. या सोबतच वडिलोपार्जित जमीन मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाजार मूल्यावर अगोदर सरकारला मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. मात्र सरकारने सुधारित शासन निर्णय काढला असून आता या शासन निर्णयानुसार तुम्हाला फक्त शंभर ₹ मुद्रांक शुल्क भरून जमीन तुमच्या नावावर करता येणार आहे.


या अधिकाराचा वापर करून फक्त १०० ₹ स्टॅम्प पेपरवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलेही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महसूल कलम अधिनियम ८५ नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतराची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. अशाप्रकारे सूचना शासनातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या आहेत.

सरकारी योजना माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360