सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या

Lek Ladki Yojana Maharashtra : ( सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या )नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. आणि या बैठकीमध्ये अनेक विविध क्षेत्राबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीत महिला आणि मुलींविषयी ही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना माहिती दिलेली आहे.

आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये झालेल्या चर्चा बद्दल तसेच लेक लाडकी योजना तसेच महिलांचा समावेश असलेल्या योजना विषयी झालेल्या चर्चेबद्दल आणि निर्णयाबद्दल अपडेट दिलेले आहेत. मार्च 2023 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंतिम प्रस्ताव मांडण्यात आल्याची घोषणा आदिती तटकरे यांनी केलेली आहे.

लाडकी योजना अंमलबजावणीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा पाठिंबा मिळालेला आहे. ही योजना मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत चालू ठेवणे,
यामागे सरकारचा उद्दिष्ट आहे की मुलांमधील एकूण जन्मदर वाढवणे, आणि ही योजना आगामी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सुरू करण्यात येत आहे मुलींचे सक्षमीकरण वाढवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आदिती तटकरे यांच्या म्हणण्यानुसार महिला सक्षमीकरणासाठी योजनेच्या पुढाकाराला यापूर्वीच्या मंत्रिमंडळाने ही मान्यता दर्शवली होती.

हे देखील वाचा… माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ, कागदपत्रे | Majhi Kanya Bhagyashree Yojna

लेक लाडकी योजना विषयी

  • लेक लाडकी योजना या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र मधील आर्थिक दृष्ट्या वंचित आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना आर्थिक मदत देणे. हा आहे या कार्यक्रमात अंतर्गत विशेषता पिवळे आणि केशरी शिधापत्रिका /रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना या अंतर्गत लाभ देण्यात येईल. या योजनेतील तरतुदीनुसार एका मुलीच्या प्रसूतीनंतर 5,000/- रुपयांची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाईल त्यानंतर राज्य सरकार मदत तरतुदीच्या टप्प्याटप्प्याने बँक खात्यामध्ये जमा करणार आहे.
  • मुलगी पहिल्या येते प्रवेश घेतल्यानंतर मुलीला 4,000/-रुपये रक्कम देण्यात येईल.
  • मुलगी सहावीत असताना तिला 6,000/- रुपये मदत देण्यात येईल.
  • 11 वी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तिला अतिरिक्त 8,000/- रुपयांची आर्थिक मदत मिळेल व त्यासाठी ती पात्र असेल.
  • आणि महाराष्ट्र सरकार मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपयांची आर्थिक मदत करेल.

Leave a comment

Close Visit Batmya360