आयुष्मान कार्ड आता सर्वांना मिळणार; तुमच्या मोबाईल वरून असे काढा ( Ayushman Bharat Card Apply Maharashtra )

Ayushman Bharat Card Apply Maharashtra  : नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यमान कार्ड हे आता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणि यासाठी शासनाकडून नवीन पोर्टल सुद्धा  सुरू केले  आहे. आयुष्यमान भारत कार्ड हे अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे, ज्याच्या मदतीने 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करता येतो. तर आज आपण मोबाईल नंबरवरून आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Ayushman Bharat Card Apply Maharashtra

IMG COM 20240114 0659 04 4860 आयुष्मान कार्ड आता सर्वांना मिळणार; तुमच्या मोबाईल वरून असे काढा ( Ayushman Bharat Card Apply Maharashtra )

आयुष्मान कार्डसाठी मोबाईल नंबरद्वारे PDF फाईल तुम्ही डाउनलोड करू न घ्या, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. या पोस्टमध्ये, प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मार्फत आयुष्मान भारत योजना कार्ड डाउनलोड बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

आयुष्मान भारत योजना, भारत सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना, 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारत देशभरात लागू करण्यात आली आहे. Ayushman Bharat Card Apply Maharashtra या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जातो.

देशातील प्रत्येक पात्र व्यक्तीला फॅमिली आयडीच्या मदतीने जवळच्या CSC किंवा आपले सरकार सेंटरमध्ये बनवलेले आयुष्मान कार्ड मिळू शकते. आयुष्मान भारत आरोग्य सुरक्षा योजना देशातील सुमारे 60 कोटी गरीब आणि असुरक्षित लाभार्थ्यांना कॅशलेस आरोग्य विमा प्रदान करते. ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे.

आयुष्मान कार्ड PDF डाऊनलोड करण्यासाठी कागदपत्रे

आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड आणि राशन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तरच तुम्ही हे कार्ड तुमच्या मोबाईल च्या माध्यमातून डाउनलोड करू शकता. जर तुमच्या आधार कार्ड ला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र CSC मध्ये जाऊन आयुष्यमान कार्ड अंगठा (Thumb) देऊन काढू शकता. Ayushman Bharat Card Download Maharashtra

आयुष्मान कार्ड डाऊनलोड करण्याची अधिकृत वेबसाईट पुढे दिलेली आहे

आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. – https://beneficiary.nha.gov.in/

आयुष्मान कार्ड आता महाराष्ट्रातील सर्व राशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आहे तर आयुष्यमान भारत कार्ड काढण्या अगोदर ही काळजी घ्यावी लागेल. Ayushman Bharat Card Download Maharashtra

1) आयुष्मान कार्ड काढण्यासाठी आता पोर्टल म्हणजेच नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे.

2) 28 जुलै 2023 GR नुसार सर्व रेशन कार्ड धारक हे कार्ड काढू शकतात. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्तीआयुष्यमान भारत कार्ड कार्ड काढू शकतो.

3) तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसला तर मोबाईल नंबर लिंक करावा लागेल.

4) आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसला तर शेजारील सेतू केंद्रामध्ये जाऊन तुमचा अंगठा देऊन आयुष्यमान कार्ड काढू शकता.

5) ज्यांचं नाव दाखवत नाही. त्यांना आपले रेशन कार्ड तहसील मधून ऑनलाइन करून घ्यावे, म्हणजे तुमच्याकडे 12 अंकी नंबर  (RC Number) असायला हवा तेव्हाच तुमचं नाव आयुष्यमान भरत योजनेमध्ये येईल.

6) केवायसी करताना Maching  Score हा ग्रीन म्हणजे हिरव्या रंगांमध्ये आला तरच कार्ड काढावे नाहीतर कार्ड काढू नये.

7) तुमचे रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड या दोन्ही वरील सगळी माहिती सारखी असेल तरच कार्ड कढता येते. सारखी नसेल तर कार्ड काढू नये. म्हणजे दोन्ही माहिती सारखी लागते. आधार कार्डवरील माहिती अपडेट करून घ्या त्यानंतरच आयुष्यमान कार्ड काढा.

8) आयुष्यमान भारत कार्ड काढताना लाईव्ह फोटो घ्यावा लागतो. तुम्ही मोबाईल मधून केले तर, live फोटो घेऊ शकता. Pc  लॅपटॉप मधून कार्ड काढले तर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप ला कॅमेरा असावा लागतो.

9) फोटो निघत नसेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन कॅमेरा ऑप्शनला Permission द्यावी लागते. तेव्हाच फोटो निघतो.

10) कार्ड काढल्यानंतर डाऊनलोड होत नसेल तर पुन्हा लॉगिन करून केवायसी च्या ठिकाणी डाऊनलोडचा ऑप्शन आहे तेथून डाऊनलोड करा. तरीसुद्धा डाउनलोड झाले नाही तर हीच प्रोसेस pc किंवा laptop मधून करावी. Ayushman Bharat Card Apply Maharashtra

11) कार्ड pending मध्ये पडले असेल तर तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरील सर्व माहिती सारखी करून घ्या आणि नंतर Redo KYC करा तिथे ऑप्शन दिला आहे. मगच आयुष्यमान भारत योजनेचे  कार्ड निघेल.

12) फॅमिली मधील कोणाचे नाव नसेल तर तिथे Add Member चा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही तुम्ही फॅमिली मधील व्यक्ती ऍड करू शकता.


📣👉आयुष्यमान भारत योजना कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

अश्या प्रकारे तुम्ही तुमचे नवीन आयुष्यमान भारत कार्ड तुमच्या मोबाईल मधून तसेच किंवा CSC केंद्रामधून काढू शकता. आणि Ayushman Bharat Card Download Maharashtra आयुष्मान कार्ड PDF मध्ये डाउनलोड केले जाईल.


Leave a comment

Close Visit Batmya360