Loan Maharashtra: मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे तसेच पडलेल्या शेती पिकाच्या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहे. यंदा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होण्याची मोठी अपेक्षा होतीच. वाढलेली महागाई आणि सरकारी धोरणाचा फटका तसेच गेल्या वर्षीचा दुष्काळ व शेतीमालाचे कमी झालेले भाव या सर्व बाजूंनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढतच चालल्या दिसत आहेत.
Loan Maharashtra
शेतकरी संघटना, विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते आहे. त्यातच सत्ताधारी पक्षाचे नेते पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सरकारकडे शेतकरी कर्जमाफी ची मागणी केलेली आहेत. तसेच सरकार 3 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिलेले आहेत.
लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहेत. परंतु सरकारकडून याबाबत अजून कोणताही स्पष्ट माहिती आलेली नाहीत. आर्थिक विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ची आवश्यकता दिसते आहे. सरकारी धोरणामुळे जसे निर्यात बंदी, खुली आयात, स्टाॅक लिमीट या कारणामुळे शेतकरी नाराज दिसत आहेत.
कर्जमाफीबाबत सरकारकडून काही घोषणा झाल्यास त्याबद्दल आपण नक्की माहिती घेऊ अजून कर्जमाफी ची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.