Maharashtra Farmer Loan: तेलंगणा सरकारने 31 हजार कोटींची कर्जमाफी करण्याची घोषणा करण्याची घोषणा केलेली आहेत. तेलंगणा सरकारच्या घोषणेनंतर राज्यात कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी केली जाते आहे. किसान सभेचे नेते अजित नवले तसेच संजय जाधव, उद्धव ठाकरे, नाना पाटोले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी राज्यात शेतकरी कर्जमाफी साठी जोरदार मागणीचा जोर लावून धरलेला पाहायला मिळत आहे.
Maharashtra Farmer Loan
तेलंगणा सरकारने जसी शेतकरी कर्जमाफी केलेली आहेत तशी राज्य राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केली आहे. 27 जुन पासुन पावसाळी अधिवेशन सुरू होत आहेत. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. ( Maharashtra Farmer Loan )
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती सुरू ; पगार 64 हजार पर्यंत; येथे करा अर्ज! Bank Of Maharashtra Recruitment 2024
राज्य सरकारने फक्त कागदावर कर्जमाफी न करता तातडीने कर्जमाफीची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी हे राज्यभरात आंदोलन करणार आहे. अशा प्रकारचा इशार त्यांनी सरकारला दिल्याचा पाहायला मिळत आहे. 2023 मध्ये खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिके हाती न आल्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची आवश्यकता दिसते आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे परंतु राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार आहे याकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहेत. या मागणी मध्ये केवळ कागदावर कर्जमाफी न करता तातडीने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा असे म्हटलेले आहे. 2023 च्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती परंतु हि घोषणा हवेतच विरुन गेलेली आहेत. ( Maharashtra Farmer Loan )
यापुर्वी 2017 आणि 2020 मध्ये महायुती आणि महा विकास आघाडी सरकारने कर्जमाफी दिली होती . परंतु जाचक अटी शर्ती असल्याने या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळालेला नव्हता. यामुळे सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय तातडीने घेऊन दुष्काळग्रस्त तसेच कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी मागणी जोर धरू लागल्याचे पाहायला मिळते आहे.