Maharashtra Loan Scheme राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या असुन नवीन सरकार स्थापन झालेले आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालेले आहे. आता महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासन पुर्ण कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Farmers scheme)
Maharashtra Loan Scheme
निडणुकीपुर्वी तात्कालिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत शेतकऱ्यांना जाहीर कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली होती. आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न उपस्थित केल्यावर पत्रकारांना माहिती दिलेली आहे.
शपथविधी नंतर पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांची पुर्तता योग्य वेळेवर करण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ कधी येणार हे पाहण्यासारखे आहेत. येत्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तरतूद करण्यात येते की पुढे निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टीमुळे जास्तच कर्जबाजारी झालेला आहे. तसेच उत्पादन खर्चात वाढ झाली असून पिकांना योग्य बाजारभाव नाही यामुळेच शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची आवश्यकता आहे. आता सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन कधी कर्जमुक्त करतयं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.