“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे खुप संतापले, पण कुणावर ते पहा?

Manoj Jarange | बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडालेली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मस्साजोग गावातील नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला हिंसक वळण मिळालेले आहे. यामुळे बीडमध्ये संतप्त नागरिकांनी एसटी बस देखील पेटविल्या आहेत. (Manoj Jarange)

या सर्व पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे चांगलेच संतापलेले आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. त्यांनी मस्साजोग गावाला भेट देत आंदोलकांशी संवाद साधलेला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजेत, आम्ही सरकारी वकील देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहेत, अशी माहिती जरांगे यांनी आंदोलकांना दिली.

1000350255 लाडक्या बहीणींनो अर्जाला ‘ही’ कागदपत्रे जोडली आहेत का? “…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”; पहा सविस्तर
लाडक्या बहीणींनो अर्जाला ‘ही’ कागदपत्रे जोडली आहेत का? “…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”; पहा सविस्तर

लाडकी बहीण योजना या महिलाच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात… येथे चेक करा

“आता तर हत्या झाली आहे, ही परिसीमा आहेत. माज करू नका हे खूप वाईट आहेत. एकदा जर मराठे बिथरले तर समाज मोठा उठाव करेल. भविष्याचा तुम्ही विचार करा, जातीवाद होवू देवू नका, आम्ही जातीचा रंग दिलेला नाही. माझं डोकं पिसाळलं तर मी कोणाचं ऐकणार नाहीत.”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी दिलेला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे काल (10 डिसेंबर) अपहरण करण्यात आलेले होते. अपहरण करून त्यांची नंतर हत्या करण्यात आली व मृतदेह फेकून देण्यात आलेला. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच, याची सीआयडी चौकशी होणार असून कोणालाही सोडणार नाही असं बीडच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

Ladki Bahin Yojana Money Deposit Bank Account
लाडकी बहीण योजना या महिलाच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात… येथे चेक करा

याच प्रकरणी बीडमध्ये काल तणाव निर्माण झाला होता. जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावी भेट देत आंदोलकांशी संवाद साधलेला आहे तसेच, या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहेत. हत्या होऊनही आमचे लोक संयमात आहे. भविष्याचा तुम्ही विचार करा, जातीवाद होवू देवू नका, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणालेले आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360