Monsoon Rain Update 2024: गेल्या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यसह देशांमध्ये चांगला मान्सून पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. परंतु त्या मानाने राज्यात पाऊस झाला नव्हता.व खरीप हंगामाच्या ऐन पेरणीच्या वेळेस पावसाने खंड दिल्यामुळे पेरण्या रखडल्या व यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. परंतु यावर्षी राज्यात जोरदार मान्सूनचा पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागासह काही परदेशी हवामान विभागाने देखील वर्तविला आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.
यावर्षी महाराष्ट्र राज्य सह संपूर्ण देशामध्ये मान्सूनचा पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान विभागासह भारतीय स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज विभागाने जाहीर केला आहे. गेल्यावर्षी च्या तुलनेमध्ये यावर्षी शेतीसाठी पोषक आणि चांगला पाऊस होणार असून महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन देखील लवकर होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
हे पण वाचा :- 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )
काय आहे मान्सून विषयी नवीन अंदाज.
देशामध्ये अल निनो चा प्रभाव एप्रिल महिन्याअखेर संपणार असून देशामध्ये एप्रिल महिन्यानंतर कडक उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीचा उन्हाळा अधिक कडक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून देशामध्ये 94 ते 104% होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Monsoon Rain Update 2024.
अमेरिकन हवामान विभागाचा नवीन अंदाज.
मागील तीन दिवसांपूर्वी अमेरिकन हवामान विभागाच्या नोआ संस्थेने भारतामध्ये यावर्षी मानसून चांगला राहणार असल्याचे भाकीत केले आहे. याच हवामान अंदाज विषयी भारतीय खाजगी स्कायमेट संस्थेला विचारले असता त्यांनी या अंदाजावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राज्यामध्ये यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांना यंदातरी दिलासा मिळेल.
हे पण वाचा :- पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव पहा..! ( Crop Insurance 2024 )
भारतीय स्कायमेट संस्थेचा मान्सून अंदाज.
राज्यसह देशांमध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत अल निनोचा प्रभाव कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. व त्यानंतर देशामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात होईल. सध्या देशामध्ये तापमानाचा पारा वाढला असून यामध्ये आणखीन थोडीशी वाढ होण्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे. व याच कारणास्तव देशात मान्सून चांगला राहील व महाराष्ट्र मध्ये मान्सूनचे आगमन देखील लवकर होईल.Monsoon Rain Update 2024.
काय आहे सद्यस्थितीच्या अवकाळी पावसाचा अंदाज.
महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यामध्ये सर्वाधिक विदर्भातील जिल्ह्यांचे नुकसान झाले. परंतु उत्तर महाराष्ट्रापासून ते तमिळनाडूच्या किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने आणखीन काही दिवस राज्याच्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील.