या तारखेला होणार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; पहा सविस्तर हवामान अंदाज! Monsoon will arrive

Monsoon will arrive: भारतीय हवामान विभागाने मानसूनची उत्तरेकडील सीमा ही अंमान समुद्र, मालदीव आणि निकोबार बेटांमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केलेले आहे. अशी अपेक्षा आहे की 31 मे पर्यंत मानसून भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये दाखल होईल. सामान्यपणे, मानसून हा 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होईल आणि, 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जून च्या आसपास मुंबईत दाखल होईल आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती नुकती देण्यात आलेली आहे.

मान्सून पूर्व सरी कोसळण्यास सुरुवात Monsoon will arrive

दक्षिण भारतात, अनेक ठिकाणी मानसूनपूर्व सरी पडत आहेत. तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या दोन राज्यांमध्ये दोन दिवस रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. रविवारी या दोन राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसामुळे पाणी साचलेले दिसलेले आहेत. गोव्यात तसेच दक्षिणेकडील इतर राज्यांमध्येही अनेक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

जगातील सर्वात मोठ चक्री वादळ महाराष्ट्राला या दिवशी धडकणार पहा आजचे हवामान Monsoon alert

महाराष्ट्रातील हवामान बदल

महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि वादळी पावसाची परिस्थिती एकाच वेळी पाहायला मिळत आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यावरही या तीव्र हवामानाचा सावट पसरलेले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये 20 तारखेला मतदान होत असून असून त्यापैकी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये या दिवशी उष्ण हवामानासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने 18 एप्रिलला अंदाज व्यक्त केला होता की या भागात काही ठिकाणी तापमान उष्ण आणि दमट राहील. परंतु धुळे आणि नाशिक मध्ये हवामान कोरडे राहणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता.

75% पिकविमा वाटप सुरु, तुमचा जिल्ह्या आहे का? यादीत नाव चेक करा.

उत्तर कोकणात वादळी पावसाचा झपाटा

उत्तर कोकणात वादळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे दुपारनंतर मावळ मतदारसंघातल्या काही भागात मतदानावर परिणाम झाल्याचे दिसले आहेत.

मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांची शक्यता

20 तारखेला मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी अशा प्रकारच्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

उत्तर भारतात उष्णतेची लाट

उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट आणि वादळी पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360