MSRTC Ticket Rate : एस टी महामंडळातर्फे प्रवाशांकरिता नवनवीन योजना राबविण्यात येतात. त्यामुळे बस ने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते. कारण बसणे महिलांकरता 50% पर्यंत आरक्षण दिलेले असून त्याचप्रमाणे वयोवृद्धांना मोफत प्रवासाची सुविधा सुरू केली आहे. मात्र या सर्व गोष्टींमुळे एसटी महामंडळावर याचा कुठेतरी परिणाम दिसून येतो. यामुळे बसच्या दरामध्ये वाढ होणार अशी बातमी समोर येत आहे. चला तर याबाबतची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे समजून घेऊया.
सीजननुसार भाडे दरवाढ
लाल परीचे दरवर्षी भाडेवाढ ही सीजननुसार होत असते त्यामुळे आता सध्या एसटी महामंडळाचे सीजन चालू झालेले आहे. सीजन नुसार भाडेतत्त्वात वाढ होणार आहे. असे एस टी महामंडळाच्या नियम व अटी मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच कारणास्तव सध्या एसटी महामंडळाचे सीजन चालू झालेले असल्यामुळे यामुळे महामंडळाच्या गाड्यांच्या भाड्यामध्ये दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. चला तर आपण जाणून घेऊया आपल्या लाल परी च्या भाड्यामध्ये जिल्ह्यानुसार कुठून कुठपर्यंत किती वाढ झालेली आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कुठून कुठपर्यंत जिल्ह्यानुसार भाडेवाढ झाली? (MSRTC Ticket Rate)
एस टी महामंडळाच्या काही जिल्ह्यांमध्ये भाडेवाढ झाल्याचे दिसून येत आहे, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू झालेली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तर्फे ही भाडेवाढ मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई या प्रवासादरम्यान ५० ₹ वाढलेली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करत असताना यापूर्वी 525 रुपये एवढे भाडे लागत होते. परंतु आता एकूण 575 ₹ एवढे भाडे प्रवाशाला लागणार आहे. MSRTC Ticket Rate
🛑📣👉 अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
रत्नागिरी ते बोरिवली 550 ₹ एवढे तिकिटाचे दर होते. त्याची 606 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे. रत्नागिरी पासून ते ठाण्यापर्यंत ५०५ ₹ ऐवजी तुम्हाला 560 ₹ रुपये आता द्यावे लागणार आहे. MSRTC Ticket Rate
राजापूर पासून ते मुंबई पर्यंत 595 रुपये आकारले जात होते, तेच आता हंगामी काळामध्ये 655 प्रवाशांना मोजावे लागणार आहे. त्याचप्रमाणे लांजा बोरवली साठी भाडेवाढ अगोदर 557 रुपये एवढे होते. त्यामध्ये वाढ होऊन आता 635 रुपये एवढे लागणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवासाला जाणाऱ्या पर्यटकांना आता लाल परी च्या भाडेवाडीचा झटका बसणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.