Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply: राज्यातील 65 वर्षे पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना आता त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलेतेनुसार सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहेत. या योजनेमध्ये 65 वर्षे पुर्ण केलेल्या आणि वयानुसार शारीरिक दुर्बलता आली असल्यास चष्मा, व श्रवणयंत्र, व्हिल चेअर, आणि फाॅल्डिक वाॅकर, कडोम खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल काॅलर इत्यादी उपकरणे विकत घेण्यासाठी एकुण 3000/- रुपयांचा निधी थेट बॅक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज सुरू झालेली असून या अर्जासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, बॅक पासबुक, पासपोर्ट 02 फोटो, स्वयं घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply
मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 : आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000/- रुपये,असा करा अर्ज! ( Mukhyamantri Vyoshree Yojana )
सहायक आणि समाजकल्याण विभागामार्फत या योजनेचे अर्ज मागवलेले असुन काही जिल्ह्यात 15 ऑक्टोबर तर काही जिल्ह्यात 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या शासन निर्णयाच्या अटीनुसार तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर सहाय्यक आणि समाजकल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रासोबत आपला अर्ज दाखल करावा. Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply