mukhymantri Ladki bahin yojana ; अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केलेली होती आणि सदर योजनेत अटी शर्ती लावल्याने महिलांची मोठी नाराजी झालेली होती. परंतु महिलांच्या मागण्या आणि विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेत 07 मोठे बदल केलेले आहेत.
लाडकी बहिण योजनेबाबत महिलांना अनेक प्रश्न पडलेले आहेत त्यापैकी महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे एका कुटुंबांतील किती महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे?. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार एका कुटुंबांतील दोन महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहेत. तसेच कुटुंबांत एका अविवाहित महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार आहेत. असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. mukhymantri Ladki bahin yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document
mukhymantri Ladki bahin yojana
एका कुटुंबांतील दोन महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहेत. तसेच कुटुंबांतील एका अविवाहित महिलांना सुद्धा सदर योजनेचा लाभ घेता येणार आहेत. लाडकी बहिण योजनेत केलेले महत्त्वाचे 07 बदल खालिलप्रमाणे झालेले आहेत.
1) महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 होती, आता ही वयोमर्यादा 21 ते 65 करण्यात आलेली आहे.
2) कुटुंबात पाच एकर पेक्षा अधिक जमीन असल्यास कुटुंबातील महिला अपात्र ठरत होत्या, आता जमिनीची अट रद्द करण्यात आलेली आहे.
3) सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै एवढी होती यामध्ये वाढ करून आता 31 ऑगस्ट हि अर्जाची शेवटची तारीख केली आहे. अर्ज करण्यासाठी 2 महिने एवढा कालावधी देण्यात आलेला आहे.
4) पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज देखील लागणार नाही.
5) लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत. याची नोंद घ्यावी
6) कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही देखील नवीन बाब जाहीर केल्यामुळे अशा प्रकारे योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. ( mukhymantri Ladki bahin yojana )