Farmer Scheme New Announcement: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जाहिरनामा सादर केलेला आहे. या जाहिरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आता वार्षिक 15 हजाराचा सन्मान निधी दिला जाणार आहे. अशी घोषणा केलेली आहे. PM किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी खातेदार शेतकऱ्यांना 12,000 रूपये दिले जात आहे यामध्ये आता 3000 रूपयाची वाढ करण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितलेले आहे.
PM किसान योजनेअंतर्गत दरवर्षी खातेदार शेतकऱ्यांना 6,000 रूपये दिले जात आहे. तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रूपये दिले जात आहेत. यापुढे नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी 9,000 रूपये दिले जाणार असून या दोन्ही योजनेचे मिळुन वार्षिक 15,000 रूपये शेतकऱ्यांना सन्मान निधी स्वरूपात दिले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार Ladki Bahin Yojana Next Installment
या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बॅंक खात्याला आधार लिंक करणं तसेच आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असणे आवश्यक आहेत. नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता यापुढे दरवर्षी 9,000 रूपये दिले जाणार आहे अशी घोषणा महायुती सरकारने आपल्या जाहिरनाम्यात केली आहे.