Panjabrao Dakh Live Hawaman: नमस्कार मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 18 नोहेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहेत. सध्या रब्बी पिकांची पेरणी सुरू असून थंडीला सुरूवात झालेली आहे. यापुढे राज्यातील हवामान कसे असेल याबाबत पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज पाहुयात.
पंजाबराव डख म्हणतात राज्यातील हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार असून थंडीत वाढ होत जाणार आहेत. तसेच पुढे 10 दिवस म्हणजे 28 नोहेंबर पर्यंत राज्यात कुठेही पावसाची शक्यता सध्या तर नाही. 28 नोहेंबर पर्यंत राज्यात थंडी वाढत जाणार आहे. व दिवसाच्या तापमानात मोठी घट होईल.
पंजाबराव डख म्हणतात कि, आता थंडीला चांगली सुरूवात झालेली असून गहू हरभरा पेरणी साठी अनुकूल परिस्थिती आहेत. तरी अद्याप ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहे. त्या शेतकऱ्यांनी पेरण्या पुर्ण करुन घ्याव्या.
लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महिलांना कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले पहा
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाजाचा Youtube Video पहावा