Panjabrao Dakh Weather Report: प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 21 नोहेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहेत. या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होणार असून त्याच्या प्रभावाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर केलेला आहे.
महाराष्ट्रात पंजाबराव डख यांनी सांगितले की 29 नोहेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. पण 30 पासुन राज्यातील हवामानात बदल होतील आणि 04 डिसेंबर पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावाने तामिळनाडू, आंध्रप्रदेश मध्ये जोरदार, मुसळधार पाऊस पडेल आणि महाराष्ट्रात सुद्धा मराठवाडा, विदर्भात तसेच इतर ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असणार आहेत.
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,
पंजाबराव डख यांनी सांगितले की पूर्वकल्पना म्हणुन हा अंदाज देत आहेत तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. 01 डिसेंबर ते 04 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे सावट असेन. पंजाबराव डख म्हणतात की वातावरणात बदल झाला तर नवीन अंदाज दिला जाणार आहे.