Pik Vima List : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आगाऊ पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली असून येत्या आठ दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा होणार आहे यामुळे आपत्तीग्रस्त 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून राज्यभरामधील 49 लाख 5032 शेतकऱ्यांचा 20 कोटी 54 लाख रुपये आगाव विम्याची रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली असून त्याचे वितरण सुरू झालेले आहे. ही त्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये वितरण पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
- बुलढाणा जिल्ह्यामधील 36 हजार 300 शेतकऱ्यांसाठी 180 (40 लाख ) दशलक्ष रुपये आगाऊ पिक विमा मंजूर करण्यात आलेला असून येत्या आठ दिवसांमध्ये पिक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलनाची हाक जाहीर केलेली आहे. 28 नोव्हेंबर रोजी बुलढाणा मध्ये एल्गार महामोर्चा आणि मान्यता आंदोलनानंतर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुंबईत धडक मारून विभाग ताब्यात घेतलेला यादरम्यानविकांत तुपकर यांच्या मागण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 29 नोव्हेंबर रोजी बैठक पार पडलेली असून सह्याद्री हॉटेल येथे झालेल्या बैठकीमध्ये बहुतांश मागण्या करण्यात मान्य करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली असून येथे आठ दिवसांमध्ये पिक विम्याची रक्कम हे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती त्यांनी जाहीर केलेली आहे.