PM किसान च्या नावाने आलेल्या App लिंक वर क्लिक करु नका! मोठी फसवणूक होऊ शकते PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : सध्या whatsaap वर अनोळखी नंबर वरून PM किसान चे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मेसेज येत आहे. परंतु हे ॲप्लिकेशन फसवे असुन अशा अनोळखी नंबर वरुन आलेल्या कोणत्याही application लिंक वर क्लिक करू नका त्यामधुन आर्थिक फसवणुकीचा धोका संभवतो आहे.

तुम्हाला देखील असा मेसेज आला आहे का? तर सावधान!! तुमचे बँक खाते देखील खाली येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या एप्लीकेशन डाउनलोड करू नका

👇👇👇( एप्लीकेशन डाउनलोड करा म्हणजे 2,000 रुपये मिळतील असे फसवे मेसेज सध्या व्हाट्सअप वर मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. Application डाऊनलोड करू नका ❌❌ )

1000259846 PM किसान च्या नावाने आलेल्या App लिंक वर क्लिक करु नका! मोठी फसवणूक होऊ शकते PM Kisan Yojana

आपल्या मोबाईल मध्ये बॅंकिंग ॲप्लिकेशन, ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन असतात. त्याचा ॲक्सेस घेऊन आर्थिक फसवणुक केले जात आहे. सध्या हे मेसेज येणे वाढले आहे तरी अशा अनोळखी नंबर वरून आलेल्या नंबर वरून कोणत्याही प्रकारची application लिंक उघडू नका.

1000259809 PM किसान च्या नावाने आलेल्या App लिंक वर क्लिक करु नका! मोठी फसवणूक होऊ शकते PM Kisan Yojana

जर तुमची आर्थिक फसवणुक झाल्यास 1930 या टोल फ्री नंबर वरून तुम्ही तातडीने कॉल करुन माहिती द्यावीत. सुरुवातीच्या दोन तीन तासांत जर वरील नंबर वर कॉल केला तर खात्यातून गेलेली रक्कम थांबवता येते तसेच परत मिळवता येतं आहे. तसेच असे काही प्रकार झाल्यास बॅंकेत किंवा पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार करावीत. असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

सध्या अनेक लोकांची फसवणुक करून खात्यातील रक्कम कट केल्याचे प्रकार दिसून येतो आहे. तरी सावधान रहावे आणि अनोळखी नंबर वरून आलेल्या ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नका. हि माहिती आपल्या गावातल्या ग्रुपवर शेअर करावी.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360