Ration Card Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना आता रेशन दुकानात दोन नवीन वस्तुंचे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे.
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली असून, या योजनेनुसार वर्षातून दोन कापडी पिशव्या मिळणार आहेत. दहा किलो वजनाइतके साहित्य ठेवता येईल, अशी विणलेली कापडी पिशवी मोफत मिळणार आहे. सहा महिन्यांच्या अंतराने एक पिशवी ग्राहकांना लवकरच देण्यात येणार आहे. Ration Card Update
PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Yojna Apply 2024
नवीन वस्त्रोद्योग धोरण
राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे. हे धोरण २०२८ पर्यंत लागू राहणार आहे. या धोरणांतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थीना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता, याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 355 रुपयांप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहेत. आता याच धोरणांतर्गत लाभार्थ्यांना कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. Ration Card Update
हे वाचा 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)
अद्याप साड्या उपलब्ध झालेल्या नसल्यामुळे; जालना जिल्ह्यामध्ये लवकरच साड्या आणि पिशव्या लवकरच उपलब्ध होतील; त्या आल्यानंतर शासन निर्णयानुसार वाटप करण्यात येणार आहेत. रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थीना मोफत साडी देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. वर्षातून दोन कापडी पिशव्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Ration Card Update
ग्रामीण भागातून साडीचे वाटप सुरू झाले आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबरोबर पुढच्या टप्यात कापडी पिशव्या वाटण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शासनाच्या सूचनांनुसार वर्षातून दोन पिशव्या देणार आहे. या पिशव्यांवर धान्य वाटप योजनेची माहिती असणार आहे. Ration Card Update