Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडलेली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चाना उधाण आलेलं आहे. दरम्यान, आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एक भाष्य केलेले आहेत, ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु झालेली आहे.
संतोष माझा बूथप्रमुख –
माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, संतोष देशमुख हा माझा बूथप्रमुख होता. हे प्रकरण घडलं त्यावेळेस गोपीनाथ गडावरुन पहिली एसआयटीची मागणी मीच केलेली होती. सध्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहे आणि ते लेकराला नक्की न्याय देतील आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा न्याय देतील असं देखील पंकजा मुंडे (Pankaja Munde)म्हणलेल्या आहेत.
कराडसह या बड्या नेत्यांची नावं आलं समोर –
दरम्यान, आज अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून पिस्तुलीचा होत असलेल्या गैरप्रकारावर ट्वीट केलेलं आहे. मात्र या ट्विटमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र आता वाल्मिक कराडच्या नावासह आता बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांची नावे पुढे आल्याने चर्चांना प्रचंड उधाण आलेले आहे.
अंजली दमानिया यांनी ट्वीटमध्ये वाल्मिक कराडसह चार आमदारांची नावं घेतलेली आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, पंकजा मुंडे किंवा या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला छळून जमिनी बळकावलेल्या असतील, तसेच खंडणी मागितली असेल किंवा कार्यकर्ते बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर आमच्या 9235353500 ह्या नंबर वर कळवण्याचं आवाहन केलेले आहेत.