Solar Pump Yojna : महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून याच्या अंतर्गत योजनेमध्ये विज जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येत, असून या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.
Solar Pump Yojana 2023
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने विषयी देखील चर्चा करण्यात आलेली असून या योजनेच्या अंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर पंप बसवून दिले जाणार असून याविषयी सध्या अर्ज करण्यासाठी सुरू आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. (Solar Pump Yojna)
या योजनेमध्ये जे शेतकरी हे वीज जोडणी साठी प्रतीक्षेमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांना तात्पुरती सिंचनासाठी सोलर पंप देण्यात येतील. आणि शेतकऱ्यांना यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना त्याची पडताळणी केल्यानंतर शेतात सोलार पंप बसवून दिला जाईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही खूप दिवसांपासून बंद पडलेली होती. पण ही आता एकदा नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेली असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवून दिले जात आहे. (Solar Pump Yojna)
आता या टप्प्यामध्ये राज्यभरामधील फक्त 2 लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत सौर पंपाचा लाभ मिळणार असून तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता. आणि याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे की शेती क्षेत्राला चालना देणे ज्यामुळे की शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकेल.