Soyabin Kapus anudan E kyc: सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2023-24 मध्ये 2 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीवर प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु, या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहेत. Soyabin Kapus anudan ekyc
ई-केवायसी करण्याचे कारण : Soyabin Kapus anudan ekyc
सरकारने दिलेल्या नियमांनुसार, अनुदान मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करणे आवश्यक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पात्रतेची खात्री करण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं आहे.
पात्र शेतकरी
या योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत:
०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी रु. १००० आणि
०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर रु. ५००० (२ हेक्टर मर्यादेत)
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत शेतकरी
ज्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा लाभ मिळत आहेत, त्यांना ई-केवायसी करायची गरज नाहीत. त्यांचे आधार क्रमांक आधीच या योजनेसाठी नोंदवले गेले आहे.
केवायसी अद्ययावत स्थिती
सध्या राज्यातील १९ लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीत. कृषि विभागाने यासाठी महा ई सेवा केंद्रांची मदत घेण्याचे आवाहन केलेले आहेत.
ई-केवायसी कशी करावी?
ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्राला भेट देऊ शकतात किंवा खालील संकेतस्थळावरून प्रक्रिया पूर्ण करू शकतात: