SSC Board New Update: दहावी बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी

SSC Board New Update: दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेला फेब्रुवारी- मार्चमध्ये सुरवात होणार आहे. कागदांचे दर वाढल्याचे कारण देत 2017 पासून शुल्क न वाढविल्याने आता बोर्डाने इयत्ता बारावीचे परीक्षा शुल्क 20 रुपयांनी तर दहावीचे शुल्क 45 रुपयांनी वाढविलेले आहे. 6 नोव्हेंबरनंतर परीक्षांचे अर्ज भरायला आणखी मुदतवाढ मिळेल, पण त्यासाठी जादा शुल्क आकारले जाणार आहेत….

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत नोव्हेंबरपर्यंत आहे. यंदा इयत्ता दहावीसाठी राज्यातील अंदाजे 17 लाख तर बारावीसाठी 15 ते 17 लाख विद्यार्थी असतील, असा बोर्डाचा अंदाज आहे. परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजारांपर्यंत केंद्रे असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी आता भाषा विषय सोडून इतर विषयांच्या दोन पेपरमध्ये किमान एक दिवसाचे अंतर ठेवले आहे….

फेब्रुवारी च्या अखेरीस सुरु झालेली बोर्डाची परीक्षा मार्च अखेरीस संपेल, असे सध्याचे नियोजन आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात दहावीचे 290 तर बारावीसाठी 210 परीक्षा केंद्रे असतील. नगर जिल्ह्यात दहावीसाठी 179 तर बारावीसाठी 109, सोलापूर जिल्ह्यात दहावीसाठी 176 तर बारावीसाठी 115 परीक्षा केंद्रे असणार …

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360