SSC HSC Timetable नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दहा दिवस आधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुढील 3 महिन्यांचा कालावधी पूर्णपणे नियोजनबद्ध अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांना खूप चिंतेत टाकणारी असते. अशा परिस्थितीत परीक्षेच्या तयारीसाठी आणि स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी योग्य तयारी आवश्यक आहे. विशेषता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचा कालावधी चांगल्या प्रकारे नियोजन करून अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
यासाठी पालकांनी देखील त्यांच्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणे गरजेचे आहेत. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर मराठी, हिंदी आणि इतर प्रथम भाषा या विषयांचा असेल. यानंतर इतर शालेय शाखांसाठी विज्ञान, कला, वाणिज्य आणि एमसीव्हीसी यासारख्या विविध शाखांच्या परीक्षा होणार आहे.
इयत्ता बारावी वेळापत्रक
प्रात्यक्षिक परीक्षा : 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
लेखी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
इयत्ता दहावी
प्रात्यक्षिक परीक्षा : 3 ते 20 फेब्रुवारी
लेखी परीक्षा : 21 फेब्रुवारी ते 17 मार्च
अभ्यासाच्या काही टिप्स
विद्यार्थ्यांनी मोबाइलपासून दूर राहणे आवश्यक आहे.
रात्री जागरण टाळावे.
शिळे अन्न न खाणे.
तासन्तास एकाच ठिकाणी बसून न राहता, थोडा व्यायाम करावा.