तलाठी भरती 2023 | तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू Talathi Bharti 2023 Online Apply :- मित्रांनो, बातम्या 360 वर आम्ही महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत नुकत्याच प्राप्त झालेल्या अपडेट नुसार तलाठी भरतीच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून जाहिराती त्या दोन तीन दिवसात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तलाठी भरती 20 जून 2023 च्या जवळपास सुरू होणे अपेक्षित असल्याची बातमी आहे. या अपडेट मुळे परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. राज्यातील गटकळ वर्गातील सर्व रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार असल्याची कळत आहे. तसेच त्यासाठी लिंक खुली करून देण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यातील चार हजार 644 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
राज्यातील पुण्यासह नागपूर नाशिक औरंगाबाद कोकण तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठी यांच्या रिक्त जागा 4644 रिक्त पदासाठी लवकर परीक्षा घेणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. भूमि अभिलेख विभागाकडून परीक्षेसाठीच्या येत्या काही दिवसांमध्ये लिंक खुली केली जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे त्यानुसार तलाठ्यांमधील नोकर भरतीतील आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारकडून पीएसआय जागा आरक्षित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख कंपनीने आयबीपीएस टीसीएस या कंपनीची निवड केलेली आहे कंपनीकडून 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या दोन तारखांमध्ये पर्याय दिलेले आहेत.
तलाठी भरती 2023 | तलाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू Talathi Bharti 2023 Online Apply
याविषयी सरकारला कळवलेले आहे याबाबत जमावबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंददायक म्हणाले की परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी द्यावी.
येत्या 20 जूनच्या जवळपास ही लिंक खुली केली जाणार असल्याचे भूमी लेख विभागाकडून अपेक्षा आहे.
राज्यात होणाऱ्या तलाठी भरती साठी राज्यातील उत्सुक असलेले उमेदवार यांची संख्या अंदाजे ही आठ ते दहा लाख असण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराला एका जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे साधारणत गटासाठी 1000 तर आरक्षण असलेल्या गटांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असल्याची माहिती समोर आली आहे.
तलाठी भरती 2023 च्या परीक्षेचे प्रारूप तयार झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे हे शक्य होणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसातच अर्जांच्या नोंदणीसाठी लवकरात लवकर लिंक खुली करण्यात येणार आहे.
परीक्षेचा अर्ज करण्यास सुरुवात झाल्यानंतर 21 दिवसांची मुदत ही उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी देण्यात येणार आहे. परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांसाठी 30 ते 45 दिवसांचा कालावधी दिला जाण्याची शक्यता आहे. तलाठी परीक्षेसाठी राज्यातून एका जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील लोकसंख्येच्या नुसार पदे निश्चित केली जातील त्यानुसार त्या ठिकाणी इतर उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत राज्यातील गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार धुळे अमरावती यासारख्या बारा जिल्ह्यांमध्ये आदिवासींचे प्राबल्ली हे मोठ्या प्रमाणावर आहे त्या लोकसंख्येच्या आजारावर तलाठी यांच्या जागा निश्चित केल्या जाणार असल्याचे सांगितले आहे.
तलाठी भरती 2023 पात्रता निकष काय आहेत?
Eligibility criteria for talati 2023?
तलाठी भरती 2023 साठी पात्रता निकष खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.
तलाठी भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :-
- पात्रता आणि अनुभव :-
- तलाठी भरतीच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी संबंधित पदा नुसार बारावी आणि पदवीपर्यंत शिक्षण झालेलं असणे बंधनकारक आहे.
- तलाठी भरतीच्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेकडून किंवा कोणत्याही विद्यापीठाकडून शिक्षण पदवी पूर्ण केलेली असावी.
- तलाठी भरती 2023 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मराठी हिंदी इंग्रजी या विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- तसेच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी शर्ती आणि सूचना यांचे पालन उमेदवारांनी करणे आवश्यक आहे.
⭕️♦️⚠️तलाठी भरती जिल्हानिहाय जागा..👉 तलाठी भरती जाहिरात आत्तापर्यंत येणे अपेक्षित होते पण काही कारणाने उशीर झाला आहे.. येणाऱ्या काही दिवसांनी जाहिरात येईल..
तलाठी भरती 2023 प्रत्येक जिल्ह्यासाठी पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करावे
तलाठी भरती चा अर्ज कसा करावा?
तलाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते.
तलाठी भरती चा अर्ज करायचा असणाऱ्या उमेदवाराचे स्वतःचे जीमेल अकाउंट असणे बंधनकारक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रत आपल्या ई मेल आयडी वर प्राप्त होईल.
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्र | List Of Document For Talati Bharti 2023
- Resume (स्वतःचा बायोडाटा)
- दहावी, बारावी, आणि पदवीची, शैक्षणिक कागदपत्रे मार्कलिस्ट
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- जात वैधता प्रमाणपत्र
- ओळखपत्र ( आधार कार्ड, लायसन्स, मतदान कार्ड )
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
तलाठी भरती जिल्हा निहाय रिक्त पदे
- नाशिक 803 जागा
- औरंगाबाद 799 जागा
- कोकण 641 जागा
- नागपूर 550 जागा
- अमरावती 124 जागा
- पुणे 702 जागा
महाराष्ट्र राज्य सरकारकडून तलाठी भरती 4122 जागांसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. राज्य सरकारकडून सर्व रिक्त जागांची माहिती देण्यासाठी शासनाकडून नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे.
तलाठी भरती 2023 साठी वयोमर्यादा काय आहे?
Age limit criteria for talati Bharti 2023
✅ तलाठी भरतीच्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वय मर्यादा 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. ही वयोमर्यादा सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी निश्चित केलेली आहे. तसेच उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे.
जाहीरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Official Website :- तलाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahabhumi.gov.in/ येथे क्लिक करा
तलाठी पदभरती -2023 जाहिरात आली.👉 अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
Talati Bharti 2023 salary details | तलाठी म्हणून नियुक्त झालेल्या उमेदवाराचा पगार किती असतो?
मित्रांनो तुमची जर तलाठी म्हणून निवड झाली तर तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे वेतन हे 25,200 ते 81,500 प्रति महिना इतका मिळत मिळेल.
Talati Bharti 2023 important update
- तलाठी भरतीची परीक्षा आत्तापर्यंत जिल्हा निवड मंडळ यांना पद घेण्यात येत होती.
- तलाठी भरती ची परीक्षा आता टीसीएस सारख्या यंत्रणेमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
- तलाठी भरतीची परीक्षा 100 प्रश्नांची आणि 200 मार्क्स साठी होत असते.
- परीक्षेचा कालावधी दोन तास असतो.
- तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धती ( Negative Marking ) नाही अशा प्रकारे सांगण्यात आले आहे.
- तलाठी भरती चा प्रश्नपत्रिका हा मराठी विषयासाठी बारावी असतो.
- तसेच इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकेसाठी दर्जा हात पदवी दर्जा समान निश्चित करण्यात आलेला आहे.
Official Website :- तलाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा