Weather forecast ; हवामान विभागाने पुढचे 5 दिवस राज्यातील बहुतांश भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती शेअर केलेली आहे. पाहुया सविस्तर नवीन हवामान अंदाज माहिती
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 02 सप्टेंबर पासून पुढचे 5 दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहेत. मराठवाडा विदर्भ काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे इशारे येत्या 24 तासासाठी दिलेला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणातही पावसाचा जोर असेल.उद्याही दि. 03 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पावसाची तिव्रता पासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहेत. (Weather forecast)
राशन मध्ये तांदुळा ऐवजी “या 5 वस्तू” मिळणार
होसाळीकर यांनी परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केलेला असून अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहेत. तसेच जळगाव, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, लातूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहेत व मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, धाराशिव, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केलेला असून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नंदुरबार, संपूर्ण कोकण किनारपट्टी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहेत.