संजय गांधी निराधार अनुदान योजना ; Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Apply

संजय गांधी निराधार अनुदान योजना ; “Sanjay Gandhi Niradhar Yojana” नमस्कार मित्रांनो आपण आज संजय गांधी निराधार योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi niradhar pension scheme | Sanjay Gandhi niladhari Yojana in Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती मिळेल.

संजय गांधी निराधार अनुदान योजना काय आहे?

संजय गांधी निराधार अनुदान योजना ; Sanjay Gandhi Niradhar Yojana


आपले महाराष्ट्र सरकार राज्यातील व्यक्तींसाठी नवनवीन योजना राबवत असते त्यापैकीच एक “संजय गांधी निराधार योजना” म्हणजेच महाराष्ट्र मध्ये निराधार पुरुष, महिला, अपंग विधवा, घटस्फोटीत झालेल्या महिला, अनाथ व्यक्ती, विविध मोठे आजार ने बाधित असलेल्या महिला, व पुरुष , परिस्तक त्या महिला, वेश्याव्यवसाय सोडून दिलेल्या ज्या आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत.

संजय गांधी निराधार योजना कोणासाठी लागू आहे?

  • महाराष्ट्र मध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या व्यक्ती आणि कायद्याची पत्नी अशा व्यक्ती या योजनेच्या लाभार्थी होऊन शकतात.
  • घटस्फोट आणि अशा प्रक्रियेतील किंवा घटस्फोट झालेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • मध्य केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नी देखील या योजनेचे लाभ घेऊ शकतात.
  • अत्याचारीत आणि पीडित महिला
  • वेश्या व्यवसायापासून मुक्त झालेल्या महिला
  • तृतीयपंथी
  • देवदासी
  • अपंग :– अंध मूकबधिर कर्णबधिर मतिमंद इत्यादी स्त्री किंवा पुरुष व्यक्ती
  • क्षयरोग कर्करोग एड्स कृष्ठरोग यांसारखे आजाराने ग्रस्त व्यक्ती किंवा रोजगार मिळवू शकणाऱ्या व्यक्ती
  • निराधार महिला निराधार विधवा निराधार परी तक्त्या

महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी कायम तत्पर देणे कार्य करत असते. आणि त्यापैकी एक योजना म्हणजे हे गांधी निराधार योजना होय. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्रातील 65 वर्षा खालील निराधार पुरुष आणि महिला तसेच अंध व्यक्ती अपंग व्यक्ती अनाथ मुले आणि मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे व्यक्ती घटस्फोटीत महिला परिपक्वता महिला वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला पंधराशे रुपये यांच्या आर्थिक साह्य हे महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येते.

आणि त्यांच्या उपजीविकेसाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी इतर दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता दैनंदिन उपजीविका भागवण्यासाठी सरकारकडून अशा प्रकारे आर्थिक मदत करण्यात येते.

संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश

  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यांमधील सर्व निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देणे आणि मदत करणे.
  • या योजनेअंतर्गत राज्यभरातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यभरातील निराधार व्यक्तींना सशक्त आणि आत्मनिर्वर बनवण्याची उद्दिष्ट या योजनेत देखील आहेत.
  • निराधार व्यक्तींना त्यांच्या दररोजच्या गरजांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी दुसऱ्या कोणावर ही विसंबून राहण्याची गरज भासू नये म्हणून सरकारकडून प्रति महिना पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्यात येते.

संजय गांधी निराधार योजनेचे वैशिष्ट्ये
Sanjay Gandhi Niradhar Yojana Features

  • महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय विभागाद्वारे राज्यभरातील निराधार व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे.
  • या योजनेचा लाभ महिला आणि पुरुष या दोघांनाही घेता येतो.
  • या योजनेमध्ये दिली जाणारी लाभार्थ्यांची लाभाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येत असते.
  • राज्यभरातील निराधार व्यक्तींची जीवनमान सुधारणे आणि तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी कोण आहेत? ; Sanjay Gandhi Niradhar Pension Scheme beneficiary

  • राज्यभरातील अपंग व्यक्ती अंध मूकबधिर कर्णबधिर मतिमंद इत्यादी वर्गातील स्त्री आणि पुरुष व्यक्ती
  • राज्यभरातील शेरू कर्करोग पक्षाघात एड्स कुष्ठरोग यांसारख्या आजाराने पीडित असलेल्या व्यक्ती
  • अनाथ मुले अठरा वर्षाखाली
  • राज्यभरातील अत्याचारित महिला
  • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
  • तृतीयपंथी
  • देवदासी

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फायदे
Sanjay Gandhi Niradhar Yojana Benefits

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी व्यक्तीस प्रति महिना 1500 रुपयांचे आर्थिक सरकारकडून केले जाते. याच्यामुळे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही मदत सरकारकडून लाभार्थ्यांना पुरविण्यात येत असते.
राज्यातील व्यक्ती सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे.
या योजनेमुळे राज्यभरातील व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यास खूप मोठे प्रमाणावर फायदा होणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी पात्रता व  निकष
Sanjay Gandhi Niradhar Yojana Terms & Condition

  • संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षांखालील असावे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसावा अशा प्रकारची राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेली आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा कोणत्याही जमीन किंवा मालमत्तेचा मालक नसावा.
  • अर्जदार व्यक्ती ही जर 65 वर्षावरील असेल तर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे खालील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे फक्त त्यांनीच अर्ज करावा.

राज्यभरातील अपंग व्यक्ती, अंध ,मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, तसेच अशा प्रकारच्या सर्व सुवर्गातील व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता त्यांचे आर्थिक उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी 21 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावी.

मूकबधिर ,कर्णबधिर ,मतिमंद ,अपंगत्व ,असलेल्या व्यक्ती यांना योजनेचा लाभ घेत असल्यास अधिनियम १९९५ प्रमाणे किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. (संजय गांधी निराधार अनुदान योजना ; Sanjay Gandhi Niradhar Yojana)

संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांची तपासणी
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Beneficiary Check

दरवर्षी एक जानेवारीपासून ते 31 मार्च कालावधीमध्ये एकदा लाभारथ्यांचे यांचे खाते आहे. अशा बँक मॅनेजर कडे अथवा पोस्ट च्या मास्तर कडे स्वतः हजर राहावे लागेल आणि या बँक खात्याची नोंद करून घ्यावी लागेल.
(कोणतेही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहत नसल्यास त्या लाभार्थ्यांनी नाही तशीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर हजर राहून याची पडताळणी करून घेणे.)
कोणत्याही प्रकारचे परिस्थितीमध्ये एकदा समोर भेट घेऊन सदर लाभार्थ्यास एक एप्रिल पासून आर्थिक साह्य निवृत्तीवेतन देण्यात येईल.
(योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी ही दर वर्षातून एकदा करण्यात येते. तसेच या तपासणीमध्ये  जर एखादा एखाद्या कारणामुळे अपात्र ठरवण्यात आला असेल तर त्याचे मासिक वेतन हे त्वरित बंद करण्यात येते.)

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी मरण पावल्यास
Sanjay Gandhi Niradhar Grant Scheme

(जर या योजनेअंतर्गत पात्र असणारा आणि मदत मिळणाऱ्या लाभार्थी मरण पावला असल्यास ग्रामपंचायत क्षेत्रात बाबतीमध्ये ग्रामसेवक नगरपालिक क्षेत्राच्या बाबतीत नगरपालिकेचा मुख्य अधिकारी तसेच महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये प्रभाग अधिकारी सदर गोष्ट ही नायब तहसीलदार तहसीलदार किंवा विभागीय आयुक्त यांच्याकडे मृत्यूच्या घटनेची नोंद करण्याचे बंधन टाकण्यात आलेली आहे आणि ही नोंद केल्यास आर्थिक सहाय्य बंद करण्यात येईल.)संजय गांधी निराधार अनुदान योजना ; Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत समाविष्ट जाती
Sanjay Gandhi Niradhar Yojana  :-

  • खुला वर्ग
  • अनुसूचित जाती SC
  • अनुसूचित जमाती ST
  • विमुक्त जाती
  • भटक्या जमाती
  • विशेष मागास प्रवर्ग
  • इतर मागास वर्ग

निराधारांचा प्रवर्ग कोणता

  • अपंग
  • अंध
  • मतिमंद
  • अस्तिव्यंग
  • मूकबधिर
  • कर्णबधिर

क्षयरोगपक्षघातकुष्ठरोगप्रमोस्तष्कघातकर्करोगएड्स (एच.आय.व्ही.)निराधार महिलाघटस्फोट प्रक्रियेतील महिलाघटस्फोट झालेली परंतु पोटगी न मिळालेली महिलाअत्याचारित महिलावेश्या व्यवसायातून मुक्त झालेली महिलाअनाथ मुलं (संजय गांधी निराधार अनुदान योजना ; Sanjay Gandhi Niradhar Yojana)

संजय गांधी निराधार अनुदान योजना कागदपत्रेSanjay Gandhi Niradhar Yojana Documents In Marathi

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • ओळख पुरावा
  • अर्जदाराचा फोटो
  • पॅन कार्ड
  • ओळखीचा पुरावा पारपत्र
  • निमशासकीय ओळखपत्र असल्यास

📢📍 संजय गांधी निराधार अनुदान योजना ऑनलाइन अर्ज
Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Application

संजय गांधी निराधार अनुदान योजना ; Sanjay Gandhi Niradhar Yojana

📝👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

Sanjay Gandhi Niradhar Yojana FAQ

संजय गांधी निराधार योजना म्हणजे काय?

संजय गांधी निराधार योजना म्हणजे 65 वर्षाखालील व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी असून त्यांच्यासाठी कोण कोणता पात्रता आहेत अशी त्यासाठी कोणकोणती लाभार्थी आहेत या योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येतो याविषयी संपूर्ण माहिती आपल्या पोस्टमध्ये दिलेली आहे त्यामुळे पोस्ट सविस्तर वाचा म्हणजे तुम्हाला याविषयी सर्व माहिती मिळेल.

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी मिळणार?

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी मिळणार याविषयी प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे पण संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात आणि याविषयीची सर्व माहिती घेण्यासाठी बँकेमध्ये भेट देऊ शकता.

संजय गांधी निराधार योजनेसाठी कोण पात्र आहे?

निराधार पुरुष, महिला, अपंग विधवा, घटस्फोटीत झालेल्या महिला, अनाथ व्यक्ती, विविध मोठे आजार ने बाधित असलेल्या महिला, व पुरुष , परिस्तक त्या महिला, वेश्याव्यवसाय सोडून दिलेल्या ज्या आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत. या व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या पात्रता कोणते व्यक्ती पात्र आहेत याविषयी बातम्या 360 आपल्या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे.

संजय निराधार योजनेचा फॉर्म कसा भरायचा?

संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरता येईल तसेच आपल्या या पोस्टमध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली आहे त्यामुळे पोस्ट वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360