Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना : महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज 28 ऑक्टोबर 2023 रोजी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्ता शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केलेली असून या योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. आणि जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल, तर तुम्ही काय करायचे आहे. याविषयी सर्व माहिती या पोस्टमधील आहे. त्यामुळे पण शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल.
नमो शेतकरी योजना पहिला हप्ता –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखेच महाराष्ट्र राज्याची देखील एखादी योजना असावी असा महाराष्ट्र शासनाचा मानस होता त्याच धर्तीवर सरकारने अधिक भरण्यासाठी नमो शेतकरी योजना विषयी घोषणाही महाराष्ट्राच्या 2023 24 चा अर्थसंकल्प मांडत असताना केलेली होती आणि या अर्थसंकल्पामध्ये 1750 कोटींचा निधी देखील वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांना निर्णय घेण्यात आलेला होता.
नमो शेतकरी योजना लाभार्थी पडताळणी
- नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळण्यासाठी राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांची संख्या – 91.90 लाख
- बँक खात्याबरोबर आधार कार्ड संलग्न प्रलंबित असणारे शेतकरी – 5.50 लाख (अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा होणार नाही आणि त्यांना केवायसी करणे आवश्यक आहे)
- ई – केवायसी प्रामाणिकरण प्रलंबित असणारे महाराष्ट्रातील शेतकरी – 5.30 लाख
नमो शेतकरी योजना पहिला हप्ता कोणाला मिळणार?
नमो शेतकरी योजनेचा लाभ हा महाराष्ट्र मधील दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त दिला जात आहे.
महाराष्ट्र सरकारच्या 2023 मधील महत्वपूर्ण नमो शेतकरी योजना लाभा एका कुटुंबामधील केवळ एकाच लाभार्थ्याला देण्यात येईल.
नमो शेतकरी योजनेचा लाभ हा एक कुटुंबातील पती किंवा पत्नी या दोघांपैकी एका व्यक्तीला दिला जाईल.
नमो शेतकरी योजनेसाठी त्या शेतकऱ्यांनी एक केवायसी पूर्ण केलेली आहे आणि सर्व कागदपत्र पूर्णपणे अपडेट केलेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे.
🛑📣📝 हे पण वाचा..! नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2023 ; नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज
नमो शेतकरी योजना चा हप्ता कोणाला मिळणार नाही?
महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये महत्त्वपूर्ण राबवलेली योजना म्हणजेच की नमो शेतकरी योजना होय.
नमो शेतकरी योजनेचा लाभ हा महाराष्ट्र मधील आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा पंचायत समिती सदस्य, आणि जे व्यक्ती लाभाचे पद धारण करतात. अशा व्यक्तींना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती राज्य सरकारने जाहीर केलेली आहे.
पी एम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जात असलेली सर्वात महत्त्वाची योजना असल्याने संपूर्ण देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील 2023 मध्ये नमो शेतकरी योजना सुरू केलेली असूनही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असल्याने मार्ग शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.