Mofat Cycle Yojna Form: जिल्हा परिषदेच्या योजना सन 2024 25 मधून 20% मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 9 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुले आणि मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी अर्जदारांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा ग्रामीण भागांतील इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणारा असावेत.
त्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेचे अंतर त्याचा मूळ राहत्या घरापासून 2 कि.मी. किंवा जास्त असावेत. ही योजना DBT तत्वावर राबविण्यात येणार असल्याने निवड केलेल्या लाभार्थ्यांने सर्वप्रथम सायकल खरेदी करुन
अनुदानासाठी मूळ देयक व सायकल खरेदी केल्याबाबतचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी अथवा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना सादर करावयचा आहेत.
Mukhymantri Ladki bahin yojana: या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत!
Mofat Cycle Yojna त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरती सायकलच्या किंमतीच्याइतके अथवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपले अर्ज गटविकास अधिकारी अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी दि. 20 जुलै, 2024 पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावे.