IMD Mansoon Alert 2024: राज्यात काही ठिकाणी मागील 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली असली तरी दि. 18 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र प्रणाली निर्माण झालेली आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला देखील आहे.
IMD Mansoon Alert 2024
पुणे हवामान खात्याचे प्रमुख यांनी ट्विटरवर वर दिलेल्या माहितीनुसार 18 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले दिसते आहे. आणि पुढे देशाच्या अंतर्गत भागात पुढे सरकत असुन त्याच्या प्रभावाने 20/21 जुलै च्या दरम्यान कोकण किनारपट्टी भागात अती मुसळधार पावसाचा अंदाज देखील देण्यात आलेला आहे. राज्याच्या अंतर्गत भागात व मध्य भारताच्या काही भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहेत. IMD Mansoon Alert 2024
हवामान विभागाने आजच सातारा, रत्नागिरी, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि मुसळधार पावसाचा अंदाज ही वर्तवला आहे. तसेच नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे, रायगड, पालघर, मुंबई, कोल्हापूर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे व जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यवतमाळ, नांदेड, परभणी, वाशीम,हिंगोली, बुलढाणा, जालना, नगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केलेला असून मध्यम पावसाचा अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.