सोयाबीन कापूस अनुदान का मिळाले नाही! लवकर करा हे काम

सोयाबीन कापूस अनुदान : राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केलेले आहे. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने 49 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 300 कोटी रुपयांचे वाटप केलेले आहेत.

राज्यातील 49 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदानाचे पैसे मिळालेले आहे. मात्र अनेक शेतकरी सोयाबीनसाठी नव्हेत तर कापसालाच अनुदान मिळाल्याच्या तक्रारी करत आहे. मात्र अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाहीत. कारण सर्व पात्र शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

अनुदानासाठी कोणत्या अटी आहे?

1) महाराष्ट्रात फक्त २ हेक्टरच्या मर्यादेतच अनुदान मिळणार आहे – म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यावय, फक्त 2 हेक्टरचे अनुदान असणार आहे.

2) २ हेक्टर कापूस आणि २ हेक्टर सोयाबीन लागवड केल्यास दोन्ही पिकांसाठी शेतकऱ्यांना एकूण 20 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.

3) ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केलेली नाहीत परंतु तलाठ्याकडे नोंदणी केलेली आहे त्यांनाही मदत मिळणार आहेत.

4) आधार संमती पत्र आवश्यक आहेत.

अनुदान का मिळालेले नाही?

राज्य सरकारने एका क्लिकवर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे वितरित केलेले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग आणि ई-केवायसी अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360