पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना: महाराष्ट्रातील खातेदार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असुन आज दि. 05 ऑक्टोंबर 2024 रोजी वाशीम जिल्ह्यातील कार्यक्रमा दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5 हप्ता वितरित करण्यात येणार आहेत. राज्यातील 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता ई-केवायसी पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना आज दि. 05 ऑक्टोंबर रोजी 4000 रूपये खात्यात जमा होणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशीम जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहेत आणि सकाळी 10 वाजल्यापासून पुढे दोन्ही योजनेचे पैसे DBT च्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत. आज आणि उद्या पर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेचे मिळुन 4000 रूपये राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
या दोन्ही योजनेच्या लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने , बॅंक खात्याला आधार लिंक असणे अतिशय महत्त्वाचे आहेत. वरील पैकी काही प्रोसेस तुमच्या पेंटिंग असतीन तर लगेच पुर्ण करा कारण त्याशिवाय तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाहीत. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तसेच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार का? हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकतात.
नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा.
पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा.