ज्या लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना २ लाखांपर्यंत लाभ आणि ३ हजार रुपये पेन्शन प्रती महिन्याला मिळणार आहेत. जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्ही हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने देखील काढू शकतात.
जर तुम्हाला ई श्रम कार्ड हे काढायचे असेल तर यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत?, अर्ज कसा करायचा?, अर्ज कोठे करायचा आणि कसा करायचा ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचावी.
ज्या नागरिकांकडे हे कार्ड आहे त्यांना ३ हजार रुपये पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येते मात्र यासाठी काही वयोमर्यादा आहे जसे की लाभार्थ्याचे वय हे ६० वर्ष किंवा यापेक्षा जास्त असावेत.
ई श्रम कार्ड धारकाचा जर अपघात झाला तर २ लाख आर्थिक मदत देण्यात येत आहे.
: ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!
ई श्रम कार्ड काढा लगेच
तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने हे ई श्रम कार्ड काढायचे असेल तर https://eshram.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
याठिकाणी तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्याखाली कॅपच्या कोड भरायचा आहे.
EPFO मध्ये आणि ESIC मध्ये जर तुमची नोंदणी असेल तर yes करा अथवा no या पर्यायाला निवडावा.
ही माहिती भरल्यानंतर खालच्या send OTP या बटनावर टच करावे.
OTP टाकून submit करायचे.
व आधारला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर OTP या पर्यायावर क्लिक करा. खालील कॅपचा भरा सबमिट या करावेत
जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्ड ला लिंक आहे त्यावर एक OTP पाठविला जाईन. पुढील चौकटीमध्ये हा OTP टाका आणि validate या बटनावर क्लिक करायचे
तुमचे आधार कार्ड याठिकाणी लिंक झालेल आहे.
याठिकाणी तुम्हाला Continue To Enter Other Details या बटनावर टच करायचे आहे.
अर्जदाराला याठिकाणी ADDRESS, EDUCATIONAL QUALIFICATION, OCCUPATION AND SKILL आणि BANK DETAILS ही माहिती भरायचे आहे.
भरलेली माहिती ही योग्य आहे याची खात्री करा. जर माहिती भरताना काही चूक झाली असेल तर तुही edit सुद्धा करू शकता. जर तुम्ही भरलेली माहिती ही योग्य असेल तर submit करायचे.
submit केल्यानातर तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकतात.
कागदपत्रे.
मोबाईल क्रामंक लिंक असलेले आधार कार्ड.
रेशनकार्ड.
छायाचित्रे.
उत्पन्न प्रमाणपत्र.
पासबुक.
ज्या व्यक्तीला हे कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीचे वय १८ वर्ष किंवा यापेक्षा जास्त असावेत.
कोणते आहे फायदे.
ई श्रम कार्ड धारक वय ६० वर्ष वयाचा झाला की त्याला ३ हजार रुपये प्रती महिना देण्यात येणार आहेत.
ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांच्यासाठी शासनाच्या वतीने खूप योजना राबविल्या जात आहेत.
यामध्ये जीवन विमा सुद्धा मिळतो. जर लाभार्थ्याचा अपघात झाला २ लाखांपर्यंत जीवन विमा देण्यात येत आहे.