Kapus Soybean Anudan Bank Account गेल्या हंगामात कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये आर्थिक मदत केली जाते आहे. कापूस आणि सोयाबीन ची नोंद असलेल्या आणि कृषी सहाय्यका कडे अर्ज करून ई-केवायसी पुर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत. एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कापूस आणि सोयाबीन मिळुन 20 हजारापर्यंत मदत मिळणार आहेत. दि. 30 सप्टेंबर पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झालेली आहेत.
Kapus Soybean Anudan Bank Account
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना गेल्या वर्षी बाजारभाव तसेच दुष्काळामुळे मोठा फटका बसलेला होता. अनेक दिवसांपासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना एकुण 4500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून आधार लिंक असलेल्या आणि अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली आहेत.
सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे तुमच्या आधारशी जे बॅंक खाते लिंक आहेत. त्याच बॅंक खात्यात DBT कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहे. तुमचे आधारशी कोणते बॅंक खाते लिंक आहेत. हे खालील प्रमाणे चेक करा. ( Kapus Soybean Anudan Bank Account)
लाडकी बहिण योजना: या महिलांना पुढचा हप्ता येणार नाही, नवीन नियम लागू पहा
कापूस सोयाबीन अनुदान या खात्यात जमा होणार चेक करा
🟢सर्वप्रथम आधार च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.. (https://uidai.gov.in/)
1) त्यानंतर माझा आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
2)पुढे ड्रॉप डाऊन मेनुमधुन आधार सेवा या पर्यायावर क्लिक करावे.
3) त्यानंतर आधार आणि बॅंक खाते लिंकिंग स्टेट्स तपासा वर क्लिक करायचे आहे.
4) त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका व सबमिटवर क्लिक करावे.
5)त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक otp येईल तो टाकावा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव आहे का? हे दिसेल तसेच कोणत्या बॅंकेला आहे हे सुद्धा पाहता येईन. जर आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर ॲक्टिव करून घ्यायचे आहे. राज्यातील एकूण सुमारे 96 लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून, आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील, तसे टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईन.( Kapus Soybean Anudan Bank Account )