लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update : नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत.

यानंतर महिलांना चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा लागलेली आहे. असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत? या महिला नेमक्या कोण असणार आहे? आणि योजनेचा एकही पैसा या महिलांना का मिळणार नाही? हे जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या खात्यात
या अगोदरचे पैसे जमा झाले होते. त्या महिलांना आता 5,500 मिळाले आहेत. तसेच ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज करूनही एकही रूपया मिळाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. त्यानंतर आता पुढचे पैसे जमा होणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात महिलांना जमा होत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

: ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!

या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागणार; कारण पहा…

पण असे असले तरी काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही. कारण माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने काही नियम आणि पात्रता निश्चित केल्या आहे. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता आहेत, त्यांना या योजनेचा एकही रूपया मिळणार नाही. याची नोंद घेणे गरजेचे आहे.

या महिला आहेत योजनेसाठी अपात्र : खालील माहिती वाचा

  • १. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहेत.
  • २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता व्यक्ती आहे.
  • ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
  • वरील नियमांत अनेक महिला बसत नसूनही ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. योजनेचा लाभ घेतला आहे. अशा सर्व महिलांना या योजनेतून मिळालेले पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. याची नोंद घेणे गरजेचे आहे

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360