Ladki bahin yojna ; महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहेत. या योजनेत 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांना मिळालेले आहेत. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच निकष (अटी, शर्ती) लावल्या असुन पाहुया योजनेच्या अटी काय आहे. (Ladki bahin news 2025)
यांच्यासोबत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीत..
1) ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे एकुण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत.
2) कुटुंबात कुणाच्याही नावावर चारचाकी गाडी असल्यावर…
3) शासनाच्या इतर कोणत्याची आर्थिक योजनेचे लाभार्थी असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीत.
4) लग्न करून महिलां दुसऱ्या राज्याची रहिवासी असल्यास लाभ मिळणार नाहीत.
5) ज्या महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाहीत.
राज्यात नमो शेतकरी योजनेच्या 20 लाख लाभार्थी महिला आहे. या महिलांना वार्षिक नमो शेतकरी योजनेचे 6000 मिळत आहेत. अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक 12,000 रूपये मिळतील असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहेत. तसेच राज्य शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. (महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे)